शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या वादात रस्ता खड्ड्यात

By admin | Updated: July 22, 2016 03:10 IST

मुंबई महापालिकेच्या एल आणि एच/पूर्व विभागात हद्दीचा वाद सुरू आहे.

सचिन लुंगसे,

मुंबई- मुंबई महापालिकेच्या एल आणि एच/पूर्व विभागात हद्दीचा वाद सुरू आहे. त्यामुळे सांताक्रुझ-सीएसटी रोडवर पडलेले भलेमोठे खड्डे उघडे पडले आहेत. येथील खड्डे ४ सेंटीमीटर खोल असून, खड्ड्यांची लांबी आणि रुंदी अनुक्रमे ८, ४ फूट आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. येथील वाहतूककोंडीने प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाया जात आहे. ऐन पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालकांच्या नाकीनऊ आणले आहेत.सांताक्रुझ पूर्वेकडून लाल बहादूर शास्त्री मार्गासह (एलबीएस) सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडला (एससीएलआर) सांताक्रुझ-सीएसटी हा रस्ता जुळतो. याच रस्त्याला वांद्रे-कुर्ला संकुलातील रस्ता कपाडियानगर येथे येऊन मिळतो. नेमके याच रस्त्यावरील सिग्नलसह मिठी नदीच्या पुलावर खड्डे पडले आहेत; शिवाय सांताक्रुझ-सीएसटी रोडच्या किनारपट्ट्यांचीही काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सांताक्रुझ पूर्वेकडून एलबीएससह एससीएलआरवर वाहणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास होतो आहे.कपाडियानगर येथील सिग्नल आणि मिठी नदीच्या पुलावर पडलेले खड्डे किमान ४ सेंटीमीटर खोल आहेत. खड्ड्यांची लांबी ८ फूट तर रुंदी ४ फूट आहे. कपाडीयानगरच्या सिग्नलवर पडलेल्या खड्ड्यांची संख्या सुमारे ५३ आहे. मिठी नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची संख्या सुमारे १०७ आहे. या खड्ड्यांमुळे कुर्ला, सायन, वांद्रे आणि सांताक्रुझकडे जाणाऱ्या वाहनांना हादरे बसत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूककोंडीत वाढ होत आहे. या वाहतूककोंडीमुळे कुर्ला, सायन, वांद्रे आणि सांताक्रुझकडे जाणाऱ्या वाहनांना ४५ मिनिटे अधिक लागत आहेत.खड्ड्यांमुळे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर सर्वाधिक वाहतूककोंडी होत आहे. एलबीएस मार्गावरील वाहनचालकांना सायन किंवा घाटकोपरला वळसा घालून मुंबईबाहेर जाण्याऐवजी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरून जाता यावे; म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता बांधला. तब्बल ८ वर्षांहून अधिक काळ सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचे काम सुरू होते. आता हा रस्ता पूर्ण झाला असला तरी सांताक्रुझ-सीएसटी रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना मनस्ताप होत आहे.>खड्ड्यांमुळे शेअर रिक्षांसाठी अधिक चार्जसांताक्रुझ-सीएसटी रोडवरून रिक्षा वाहण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: कुर्ला स्थानक आणि सांताक्रुझ स्थानकाकडे वाहणाऱ्या शेअर रिक्षा या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. येथील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत असून, स्थानक दिशेला जाण्यास वेळ लागतो. वेळ लागत असल्याने मीटरचे रीडिंग वाढते; शिवाय शेअर रिक्षाचालकाकडून १०ऐवजी १५ रुपये आकारले जातात. परिणामी, ग्राहकांना याचा नाहक भुर्दंड सोसावा लगतो. दुसरीकडे या खड्ड्यांमुळे रिक्षांचे स्पेअर पार्ट्स ढिल्ले होत असल्याने रिक्षाचालकांच्या खर्चात भर पडते. येथील खड्ड्यांचा त्रास पावसाळ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर वर्षाचे बारा महिने हा रस्ता खराब असतो.>वाहतूक पोलीसही कंटाळलेमंगळवारी सकाळी ९ ते १० या वेळेत ‘लोकमत’ने सांताक्रुझ-सीएसटी रोडची दुरवस्था कॅमेऱ्यात कैद केली. या वेळी कपाडियानगर येथील सिग्नलवर दोन वाहतूक पोलीस तैनात होते. ‘लोकमत’ टीम खड्ड्यांचे वृत्तांकन करत असल्याचे पाहून ‘तुम्हीच या रस्त्यांचे काहीतरी करू शकता, आम्ही वाहतूककोंडीला कंटाळलो आहोत,’ अशी भावना त्यांनीव्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे ‘लोकमत’ टीमने जेव्हा येथील खड्ड्यांची लांबी, रुंदी आणि खोली मोजण्याचे काम हाती घेतले; तेव्हा वाहतूक पोलिसांनी आवर्जून वाहने सिग्नलवर थांबवले. मोठ्या खड्ड्यांची लांबी, रुंदी आणि खोली मोजून झाल्यानंतरच वाहतूक पोलिसांनी वाहने सोडली. शिवाय येथील रस्त्यांसाठी काहीतरी करा, अशी विनंतीही पोलिसांनी केली.