शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामासाठी देवस्थान बुजवले

By admin | Updated: June 28, 2016 03:59 IST

केडीएमसीने बुजवल्याचा आरोप करून वाडेघरच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला

कल्याण : रस्त्याच्या कामासाठी ग्रामदेवतेची शिळा केडीएमसीने बुजवल्याचा आरोप करून वाडेघरच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. देवस्थान जागेवरून हलवू देणार नाही, अन्यथा टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. उंबर्डे, सापार्डे, वाडेघर आणि वाडेघरपाडा अशा चार गावांचे वाडेघर सीमेवर श्री ब्राह्मणदेव हे ग्रामदैवत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे दैवत आहे. तेथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम दोन दिवसांपूर्वी करण्यात आले होते. यात दुभाजकाच्या बाजूला असलेली ग्रामदेवतेची शिळा विकासकाने जेसीबी लावून कापण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती निघाली नाही. अखेर, त्यावर मातीचा भराव टाकून डांबरीकरण केले. हा प्रकार समजताच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. देवाची विटंबना झाल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी डांबरीकरण झालेला रस्ता पुन्हा खोदला आणि बुजवलेली शिळा उकरून काढत त्याची पुन्हा पूजाअर्चा केली. यानंतर, ग्रामस्थांनी त्यांचा मोर्चा केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर नेला. तेथे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना वाडेघर संघर्ष समितीने निवेदन दिले. ग्रामस्थांना विश्वासात न घेता डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु, देवाची जागा न बदलता जेथे देव आहे, तेथेच त्याच्याभोवती सिमेंट कठडा बांधून द्यावा, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. संबंधित जागा ही खाजगी होती. त्यामुळे संबंधित विकासकाला टीडीआर दिल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. ज्या जागेवर देव आहे, त्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही, केडीएमसीने विकासकाला टीडीआर कसा दिला, असा सवाल या वेळी संघर्ष समितीने प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना केला. (प्रतिनिधी)>आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्नसंघर्ष समितीने महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अन्य कामात व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती ग्रामस्थ देवानंद भोईर यांनी दिली.