शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावरील गतिरोधक हटविले

By admin | Updated: June 9, 2016 03:27 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले होते. गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या गतिरोधकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. या टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटून नुकसान होऊन अपघातही घडले आहेत. त्यामुळे हे गतिरोधक काढण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांमुळे घडतात अपघात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने हे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला असला तरी या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान अनेक ठिकाणी गरज नसताना गतिरोधक टाकण्यात आले आहेत व हे गतिरोधक कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागल्याने अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी अशा प्रश्न वाहनचालक यांनी उपस्थित केला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. (वार्ताहर) >बातमीची दखलकोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले होते. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहेत. ही बातमी प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील शेलू, व अन्य ठिकाणचे गतिरोधक काढण्याचे काम सुरु केले आहे. सोमवारी जेसीबी सहाय्याने हे गतिरोधक काढण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे ठेकेदार, अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित होते.