शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमधील रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 15, 2016 03:48 IST

तालुक्यातील रस्त्यांवर गेल्या तीन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने १४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

अलिबाग : तालुक्यातील रस्त्यांवर गेल्या तीन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने १४ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधात पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यांच्याविरोधात तक्रार आहे त्यांच्याच विभागाकडूनच अहवाल मागविण्यात आल्याने सत्य समोर येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाच अलिबाग तालुक्यातील रस्त्यांवर सुमारे १४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असताना रस्त्यांची वाट कशी लागली. याविरोधात अलिबाग नगर पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात रस्त्यांची माहिती प्राप्त केली. त्यामध्ये अलिबाग-पेण, अलिबाग- रेवस, अलिबाग- रोहे, अलिबाग- रेवदंडा या रस्त्यांवर गेल्या तीन वर्षात सुमारे १४ कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले. यातील दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकूर यांनी केली. सुप्रभात कस्ट्रक्शन, सुप्रभात इन्फ्राझोन, चिंतामणी प्रोजेक्ट्स, एस.एस. कन्स्ट्रक्शन, एस कुमार कन्स्ट्रक्शन, विनायक रोड बिल्डर्स, यासह अन्य ठेकेदारांनी येथील रस्ते केले आहेत. विशेष म्हणजे ई-टेंडरिंग करता येऊ नये यासाठी या रस्त्यांचे काम त्यांनी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये केले आहे. या रस्त्यांची पुरती दैना उडाली असल्याने प्रवाशांना येथून वाहन चालविणे कठीण झाले आहे. तसेच यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. परंतु ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाविरोेधात तक्रार करण्यात आली आहे त्यांच्याकडूनच पोलिसांनी अहवाल मागितला आहे. त्यामुळे तपास योग्य दिशेने होणार नसल्याचे बोलले जाते.पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करणे क्रमप्राप्त होते. मुंबईमध्ये असे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसे धाडस अलिबाग पोलिस दाखवत नसल्याचे तक्रारदार अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)>चोरांना वाचविण्याचाच प्रकार पोलिसांचे हे प्रयत्न म्हणजे चोरांना वाचविण्याचाच प्रकार आहे. ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, असे अधिकारी, ठेकेदार यांना यातून क्लीन चिट मिळण्यास मदत होईल, असे आम आदमी पार्टीचे दिलीप जोग यांनी लोकमतला सांगितले.तपास सुरु आहेपोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत तक्रार असेल, तर त्यांचे वरिष्ठ त्याबाबतचा अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला सांगितले.>पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करणे क्रमप्राप्त होते. मात्र अलिबाग पोलिसांनी कारवाई के लीनसल्याचे अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी सांगितले.