शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नोटरीसाठी रिझवानचे ‘किल्ला कोर्ट कनेक्शन’ आले समोर

By admin | Updated: July 27, 2016 02:47 IST

एटीएसने ताब्यात घेतलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या अर्शीद कुरेशीच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील तरुण-तरुणींच्या धर्मांतरासाठी कुरेशीचे दक्षिण मुंबईतून

- मनीषा म्हात्रे, मुंबई

एटीएसने ताब्यात घेतलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या अर्शीद कुरेशीच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील तरुण-तरुणींच्या धर्मांतरासाठी कुरेशीचे दक्षिण मुंबईतून रजिस्टे्रशन सुरू होते. यासाठी त्याने तेथील एका मशिदीचा आसरा घेतला होता. शिवाय कल्याण येथून अटक केलेल्या रिझवानने या धर्मांतर झालेल्यांच्या नोटरीसाठी किल्ला कोर्टाबाहेरील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले होते. त्यामुळे किल्ला कोर्टासह दक्षिण मुंबईतील संपूर्ण परिसरावर एटीएसचा वॉच आहे.राज्य दहशतवादविरोधी पथकाने गेल्या १० वर्षांत धर्मांतर केलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास अडीच हजाराहून अधिक जणांनी धर्मांतर केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मुंबईतील ३०० जणांचे धर्मांतर झाले असल्याचे समजते. त्यामुळे एटीएसने या सर्वांना विश्वासात घेऊन अधिक शोध सुरू केला आहे. या सर्वांचा धर्मांतराचा मार्ग कुणामुळे मोकळा झाला आणि कसा याबाबत एटीएसकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. कुरेशी या तरुण-तरुणींना नवीन मुंबईतील त्याच्या कार्यालयात नेऊन तेथे त्यांना धर्मांतराचे धडे देत असे. धर्मांतराबाबत अधिक माहिती देण्यासाठी तो त्यांना डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या कार्यालयात आणत असे. त्याचदरम्यान येथील एका मशिदीमध्ये या तरुण-तरुणींच्या धर्मांतराचे रजिस्टे्रशन केले जात असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. त्यानंतर कल्याणच्या रिझवानवर त्यांच्या नोटरीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रिझवानला अटक केल्यानंतर त्याने किल्ला कोर्ट परिसरातून नोटरी केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एटीएसने तेथील नोटरी करून देणाऱ्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. दोघांच्या चौकशीत मोठे जाळे उघड होण्याची शक्यता एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.