शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रिझवान अल्पवयीन असल्याचा वकिलांचा दावा

By admin | Updated: January 31, 2016 02:08 IST

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान ऊर्फ नवाजुद्दीन हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. त्यानंतर न्यायालयाने रिझवानला

-डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान ऊर्फ नवाजुद्दीन हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. त्यानंतर न्यायालयाने रिझवानला ११ फेब्रुवारीपर्यंत कोठडी देताना त्याची रवानगी डोंगरी येथील निरीक्षण केंद्रात केली. मालवणी परिसरातील युवकांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्याच्या आरोपाखाली रिझवानला एटीएसने अटक केली.रिझवानच्या वकिलाने त्याचा शाळेचा दाखला न्यायालयात सादर करून तो केवळ १६ वर्षांचा असल्याचा दावा केला, तर एटीएसने रिझवान सज्ञान असल्याचे सांगितले. रिझवानच्या बचावासाठी दाखविण्यात आलेली शालेय प्रमाणपत्रे त्याच्या पालकांनी बेकायदेशीररीत्या मिळवली असून, त्याच्या निवडणूक ओळखपत्रावर तो २२ वर्षांचा असल्याचे नमूद केले आहे, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेत दोनदा नापास झाल्यानंतर रिझवानच्या वडिलांनी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. रिझवानने चौकशीत तो १९ वर्षांचा असल्याचे सांगितले होते, तर मतदान ओळखपत्रावरून तो २२ वर्षांचा असल्याचे दिसते. तो सज्ञान असल्याचे सिद्ध करण्यासाठी मूळ कागदपत्रे मिळविण्याचे निर्देश आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर बाल गुन्हेगारविषयक कायद्यातील बदलानुसार तो १६ वर्षांचा असला तरी त्याच्याशी सज्ञान म्हणूनच व्यवहार केला जाईल, असे एटीएसमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले.राष्ट्रीय तपासी संस्था (एनआयए) आणि एटीएसने संयुक्त मोहीम राबवून रिझवानला अटक केली होती. थेट परदेशी सूत्रधाराच्या निर्देशावरून मुंबईतील तरुणांना कट्टरवादी बनवून संघटनेत सामील करून घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील या युवकांवर प्रभाव टाकण्यासाठी रिझवानने किमान दोन वेळा मुंबईला भेट दिली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.