शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत

By admin | Updated: May 1, 2017 19:34 IST

शासकीय महाविद्यालयात स्थापन झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत आहे.

राम शिनगारे/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 1 - शासकीय महाविद्यालयात स्थापन झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत आहे. यासाठी मृदा आणि जल व्यवस्थापन संस्था (वाल्मी) आणि याच संस्थेला लागून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या निवास्थानाची पाहणी कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यासह इतरही ठिकाणच्या जागेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. मात्र सात वर्ष केवळ घोषणांवर बोळवण होत होती. याउलट नागपूर, मुंबई येथील विधी विद्यापीठाला सुरुवात झाली. यानंतर औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या. यात कुलगुरूपदी डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक करत महत्वाचे पाऊल उचलले. याचवेळी विधी विद्यापीठाच्या करोडी परिसरातील जागेवर बांधकाम होईपर्यंत शासकीय अध्यापक महाविद्यालयात विधी विद्यापीठ सुरू करण्यात आले. या महाविद्यालयात काही सुविधा निर्माण करण्यासाठी निधीही देण्यात आला. मात्र विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी विविध शैक्षणिक ठिकाणांच्या जागांची चाचपणी सुरू केली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत वाल्मीसह इतर ठिकाणच्या जागेची पाहणी केली आहे. आगामी तीन वर्षांत विद्यार्थ्यांना पुरतील एवढ्या वर्ग खोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणाऱ्या ठिकाणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यादृष्टीने तयारी करण्यात येत असून, लवकरच जागा बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.- शासकीय अध्यापक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासंदर्भात काही आडचणी निर्माण होत आहेत. यामुळे क्लास रुम आणि वसतीगृहाची सुविधा असणाऱ्या जागेची पाहणी करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाचे कार्यालय शासकीय अध्यापक महाविद्यालयातच राहील. केवळ विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. अद्याप कोणत्याही जागेची निवड केलेली नाही. जागा निवडल्यास कळविण्यात येईल.- डॉ. एस. सूर्यप्रकाश, कुलगुरू - विधी विद्यापीठाचे कुलगुरू आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मीमध्ये क्लासरूमची पाहणी केली. मात्र आमच्याकडे वसतीगृहाची सुविधा उपलब्ध नाही. दोन-तीन वर्षांसाठी क्लासरूमची मागणी करण्यात आली, तर संस्था नक्कीच सकारात्मक विचार करेल.- एच. के. गोसावी, महासंचालक, वाल्मी