शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रितेशची वारी ‘लय भारी!’

By admin | Updated: July 12, 2014 00:24 IST

मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून प्रथमच भूमिका रंगवणा:या रितेश देशमुखचा ‘लय भारी’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे.

लोकमत कार्यालयास भेट : उलगडली चित्रपटनिर्मितीची कहाणी
मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून प्रथमच भूमिका रंगवणा:या रितेश देशमुखचा ‘लय भारी’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. याआधी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून उतरलेल्या रितेशने मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करताना लय भारी चित्रपट निवडला आणि याच चित्रपटाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख, निर्माते अमेय खोपकर आणि एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांनी ‘लोकमत’च्या वरळी कार्यालयात लय भारी  वारी केली. या वारीचा वृत्तान्त खास लोकमतच्या वाचकांसाठी.. 
 
हा आमचा पहिला चित्रपट आहे. याआधी आम्ही लघुपट व मालिका केल्या होत्या. लय भारी  या चित्रपटाचा विषय आम्ही रितेश देशमुख यांना ऐकवला, याचे कारण म्हणजे आम्हाला या चित्रपटासाठी तेच हवे होते. दुस:या कुणाला घेऊन हा चित्रपट होऊ शकत नाही, यावर आम्ही ठाम होतो. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत, हे चुकीचे असल्याचे आम्हाला दाखवून द्यायचे होते. लोकांर्पयत चांगले चित्रपट आणले, तर ते नक्की चालतात. गेल्या काही काळात हे अनेक चित्रपटांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आम्ही हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कुठेही तडजोड करायची नाही, यावरही आम्ही ठाम होतो. 
- अमेय खोपकर, निर्माता, सिनेमंत्र 
 
रितेश देशमुख :- लय भारी या चित्रपटाच्या निमित्ताने मला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. अनेक वर्षे मी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतोय, पण ते करत असताना नेहमी वाटत होते की मराठीतसुद्धा काम करावे. माङो वडीलही मला विचारायचे की तू हिंदी चित्रपटात काम करतोस, तर मराठीत कधी काम करणार? पण अचूक वेळ येण्यासाठी मी थांबलो होतो. मध्यंतरीच्या काळात सिनेमंत्रची टीम माङयाकडे आली आणि त्यांनी सुचवलेला विषय मला आवडला. हा विषय मला वेगळा वाटला. लय भारी हा चित्रपट म्हणजे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एक पूर्णत: व्यावसायिक चित्रपट द्यायचा असाच आमचा यामागे हेतू आहे. 
   हिंदी चित्रपटाशी आमची स्पर्धा असावी असे काही मनात नव्हते, पण आमचा आमच्या चित्रपटावर आत्मविश्वास आहे. मुळात कथा वाचल्यावरच चित्रपट काय आहे ते समजते. आता इतकी वर्षे या इंडस्ट्रीत असल्याने हा अनुभव आहेच. हिंदी आणि दक्षिणात्य भाषेत अशा प्रकारचे चित्रपट झाले असले, तरी मराठीत मात्र हा वेगळा प्रकार आम्ही आणला आहे. आम्ही हा संपूर्ण व्यावसायिक चित्रपट केला आहे आणि त्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवला पाहिजे. मी याआधी ‘बालक पालक’ आणि ‘यलो’च्या निमित्ताने मराठी चित्रपटनिर्मिती केली; परंतु लय भारी हा चित्रपट त्या पठडीतला नाही. हा फेस्टिव्हलचा चित्रपट नाही. पण या चित्रपटाने थिएटरमध्येच फेस्टिव्हल होईल याची मला खात्री आहे. 
या चित्रपटाच्या आधीही माङयाकडे मराठी चित्रपटांसाठी विचारणा झाली होती, पण तेवढी सशक्त कथा मला सापडत नव्हती. त्यामुळे मी चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि त्याचवेळी माङयासमोर लय भारीची कथा आली. 
ही कथा पाहिल्यावर हा चित्रपट करायचा हे पक्के झाले. मी एक अभिनेता आहे. त्यामुळे ठरावीक चित्रपटच करायचे असे काही ठरवले नव्हते. मी आतार्पयत कौटुंबिक चित्रपटही केले आहेत, तसेच विनोदी चित्रपटही केले आहेत. विनोदी चित्रपट हासुद्धा एक प्रकारचा जॉनर आहे आणि मी तो स्वीकारला. पण माङया या प्रकारच्या भूमिकांपेक्षा एक वेगळा लूक लय भारीमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माझी इमेज तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
लय भारी या चित्रपटाच्या शीर्षकातच सर्वकाही आहे. या चित्रपटातील माउली या पात्रचे वागणो या शीर्षकात आहे. आपण करतो तेच लय भारी अशी या पात्रची विचारसरणी आहे. लय भारी  या शब्दात दम आहे, आपुलकी आहे आणि आपलेपण आहे. हा शब्द प्रत्येकाला आपला वाटतो आणि प्रत्येक जण हा शब्द स्वत:च्या खास पद्धतीने वापरतो. या शीर्षकातून आपलेपणा जाणवतो आणि यातच या चित्रपटाचे यश आहे. 
मी लातूरचा आहे, त्यामुळे माझी भाषा त्या वळणाची आहे. मुंबईत राहून भाषा थोडी बदलली. या चित्रपटात मात्र दोन्ही प्रकारची भाषा वापरली आहे. यात माउलीची जी भाषा आहे, ती माङया गावाची भाषा आहे. या चित्रपटात आम्ही प्रामाणिकपणा जपला आहे. यात जी वारक:यांची दृश्ये आहेत, त्यात खरोखरच वारकरी आहेत. त्यांच्याऐवजी कुणी कलाकारांनी यात वारक:यांच्या भूमिका केलेल्या नाहीत. आम्ही या चित्रपटाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. मी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ज्या ज्या भागांत दौरे केले, त्या त्या भागांत मला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मराठी लोकांनी मराठी चित्रपट जर पाहिले नाहीत, तर आपली इंडस्ट्री टिकाव धरणार नाही, असे मला वाटते. पण यात महत्त्वाचे असे की आपणही त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे प्रॉडक्ट द्यायला पाहिजे. मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकाला आपला वाटला पाहिजे.
- शब्दांकन : राज चिंचणकर