शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसह युवा पिढीला व्हिजन सिंड्रोमचा धोका

By admin | Updated: June 13, 2014 00:39 IST

अधिक वेळ संगणकासमोर बसणे धोकादायक

अकोला : आज प्रत्येकाच्या घरात संगणकाने जागा मिळविली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असल्याने लहान मुले व युवा पिढी संगणकाच्या विश्वात रमलेली दिसून येते; मात्र तासन्तास संगणकासमोर बसून राहण्याने त्याचा विपरीत परिणाम लहान मुले व युवा वर्गाच्या आरोग्यावर होत असून, कॉम्प्युटरमुळे व्हिजन सिंड्रोमचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे.माहिती तंत्रज्ञानामुळे घराघरात संगणक पोहोचला आहे. संगणक घरात असल्यामुळे बच्चे कंपनी त्यांच्या विश्वात रमू लागली आहे. युवा वर्ग व घरातील मोठी मंडळीदेखील यात रममाण होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शरीरास आवश्यक असलेल्या मैदानी खेळाकडे प्रत्येक जण पाठ फरवित असल्याचे दिसून येते. तासन्तास संगणकासमोर बसून गेम्स खेळणार्‍या बच्चे कंपनीला कार्टुनच आता जवळचे साथीदार वाटू लागले आहेत. तर युवा पिढीदेखील फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्समध्ये डोके खुपसून बसलेली असतात. आजची टेक्नोसॅव्ही युवा पिढी त्याला सहज हाताळत आहे. मग काय, आपल्या आवडीचे गेम्स वा साईट्स सर्च करताना दोन-तीन तास कसे उलटून जातात, हेही त्यांना कळत नाही. संगणकाचा कामासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापर होत असल्याचे दिसून येते. अगदी तहान-भूक विसरून रममाण होताना नित्याची दिनर्चादेखील बाजूला सारली जाते. अधिक काळ स्क्रिनसमोर बसून राहण्याने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचा धोका वाढला असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिला आहे. ५ वर्षांपासून ते १५ वर्षे वयाच्या मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, हे प्रमाण दिवसागणिक २० टक्क्याने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकसारखे कॉम्प्युटरसमोर बसल्यामुळे डोळ्यांवर ताण पडून दृष्टी क्षमता कमी होऊ शकते, या पृष्ठभूमीवर पालकांना सावधानतेचा इशरादेखील देण्यात आला आहे. ** लक्षणेसंगणकावर एकटक बघितल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळे कोरडे पडतात. पापण्यांच्या हालचाली होत नाहीत. डोळ्यातून पाणी येते. डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज सुटणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. परिणामी नेत्ररोग होण्याची अधिक संभावना बळावते. डोकेदुखीचादेखील त्रास होतो. केवळ मुलांनाच नव्हे, तर युवा पिढीला व मोठ्या मंडळींनादेखील हा त्रास होतो.