शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साचण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:13 IST

सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही.

पुणे : सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही. अशा रस्त्यांवर पाणी मुरत नसल्याने पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचेल. ते वाहून गेले नाही, तर साचून राहण्याचा धोका असल्याने पावसाळी गटारे, नाले स्वच्छ करण्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वडगाव शेरी नागरिक मंचने केली आहे.नगर रस्ता परिसरामध्ये पावसाळ्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. गटारींमधून पाणी वाहून जात नसल्याने ते रस्त्यावर साचून राहते व त्यातून अपघात होतात. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये वडगाव शेरी व इतर परिसरातील अगदी गल्लीबोळातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले गेले. त्यामुळेच या भागात पुन्हा पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे वडगाव शेरी नागरिक कृती मंचचे म्हणणे आहे. त्यामुळेच क्षेत्रीय कार्यालयाने या भागाच्या प्रभागनिहाय बैठका आयोजित करून नागरिकांकडून माहिती करून घ्यावी व त्यांनी सुचवलेले नाले, गटारी यांची त्वरित स्वच्छता करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी ३० मेपूर्वी शहरातील सर्व नाले व गटारी स्वच्छ करण्याचे आदेश दिले असले, तरी क्षेत्रीय कार्यालयांनी त्याची फारशी दखल घेतली गेली नसल्याचेच दिसते आहे. (प्रतिनिधी)