शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळण्याचा धोका !

By admin | Updated: August 5, 2014 01:05 IST

रामदेवबाबा टेकडी परिसर शहरातील एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. किमान दीडशे फुट उंच असलेली ही टेकडी (पहाड) विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. यावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

कुतुबशहानगरही संकटात : प्रशासन लक्ष घालणार का ?नागपूर: रामदेवबाबा टेकडी परिसर शहरातील एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. किमान दीडशे फुट उंच असलेली ही टेकडी (पहाड) विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. यावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. तसेच रामदेवबाबांचे सुंदर मंदिरसुद्धा आहे. शहरातील एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा ही टेकडी ओळखली जाते. या टेकडीच्या आजूबाजूला वस्त्या वसल्या आहेत. अगदी समोरच्या बाजूला पोलीस लाईन टाकळी, गिट्टीखदान पोलीस ठाणे, तसेच मागच्या बाजूला भूपेशनगर,अनंतनगर या वस्त्या आहेत. परंतु या टेकडीपासून लांब आहेत. मात्र या टेकडीला लागून गिट्टीखदान परिसरातील कुतुबशहानगर आणि दशरथनगर हा झोपडपट्टीचा परिसर वसला असून तो सर्वाधिक धोकादायक आहे. कारण या दोन्ही वस्त्या थेट पहाडाला लागून असून वरून दगड-धोंडे कोसळूून पडणे ही रोजचीच बाब झाली आहे. लोकांच्या घरांवर दगड पडल्याने अनेक अपघातही झाले आहेत. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिक सर्वाधिक दहशतीत असतात. माळीणची घटना घडल्यानंतर आमच्या चमूने या वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गरिबी व नाईलाजास्तव लोकांनी येथे घरे थाटली आहेत. परंतु पावसाळ्यात कधी कुठून दरड किंवा दगड कोसळून पडेल याचा नेम नाही, त्यामुळे येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊनच जगत आहेत. त्यामुळे माळीणसारखी घटना येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माळीणची घटना घडली तेव्हा ती रोखता येईल यासाठी प्रशासनाला वेळही मिळाला नाही. तेव्हा तीच पुनरावृत्ती नागपुरात होऊ नये, या उद्देशाने शासन व प्रशासनाला यातून काही उपायाजना करता याव्यात, म्हणून या वस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.