शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नकारात्मक विचारांमुळे हृदयविकाराचा धोका

By admin | Updated: April 13, 2015 05:44 IST

कामाचा ताण, कामाच्या वेळा पाळणे, दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करणे अशा कारणांमुळे अनेक तरुणांच्या मनावर ताण असतो. या ताणाचे रूपांतर अनेकदा

मुंबई : कामाचा ताण, कामाच्या वेळा पाळणे, दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करणे अशा कारणांमुळे अनेक तरुणांच्या मनावर ताण असतो. या ताणाचे रूपांतर अनेकदा नकारात्मक विचारात होत असते. पण हे नकारात्मक विचार आणि ताण सातत्याने राहिल्यास त्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवत असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे. हिंदुजा रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी. के. पोंडे यांनी यासंदर्भातील एक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, मुंबईतील एक ३८वर्षीय व्यक्ती श्वसनाचा त्रास होत असल्याने माझ्याकडे आली. या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला होता. त्याचा ईसीजी काढल्यानंतर हृदयाच्या दोन प्रमुख धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्याच्यावर तत्काळ अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही व्यक्ती व्यसनी नव्हती. पण, त्याला कामानिमित्त अनेकदा बाहेरगावी जावे लागायचे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याची विचारसरणी नकारात्मक झाली होती. सततच्या ताणामुळे अनेक जणांना हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यामुळे हृदयातील धमन्यांमध्ये रक्त साखळले जाऊन ब्लॉकेज तयार होतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे डॉ. पोंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)