शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जलप्रलयाचा धोका - संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By admin | Updated: May 20, 2016 16:11 IST

जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 20 - जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2050 पर्यंत भारतातील समुद्रकिनाऱ्यानजीक राहणाऱ्या सुमारे 4 कोटी लोकांना पूराचा फटका बसू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या शहरांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे, त्यांना जास्त धोका आहे.
ग्लोबल एन्व्हायर्नमेंट आउटलुकच्या अंदाजानुसार पॅसिफिक आणि आशियामधील देशांना वातावरणातील बदलांमुळे सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. 2050 पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे सगळ्यात जास्त 10 शहरांचे नुकसान होणार असून त्यातली 6 शहरे आशिया पॅसिफिकमध्ये येतात.
 
सगळ्यात जास्त धोका भारताला
 
ज्या देशांना सर्वादिक फटका बसणार आहे, त्यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. भारतामध्ये 4 कोटी लोकांना पुरांचा व अन्य जलप्रलयाचा फटका बसेल तर त्याखालोखाल बांग्लादेशमधल्या 2.5 कोटी लोकांना सागरी कोपाच्या झळा बसणार आहेत. चीनमधल्या सागरी किनाऱ्यानजीक राहणाऱ्या 2 कोटी लोकांना फटका बसणार असून फिलिपाइन्समध्ये 1.5 कोटी लोकांना जलप्रलयाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
वाढत्या वसाहतींचा ताण
 
सागरी किनाऱ्यानजीक शहरीकरण वेगाने वाढत असून त्यामुळे व आर्थिक विकासामुळे वसाहतींची संख्या वाढत आहे. यामुळे सागरी किनाऱ्यांची जलप्रलयाचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता कोलमडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. विशेषत: भारत, चीन व थायलंडमध्ये आर्थिक प्रगतीमुळे नागरीकरण वाढत आहे, आणि लोकसंख्येचे केंद्रीकरण होत आहे. 
 
 
पूर व जलप्रलयाचा धोका असलेली शहरे
 
भारत - मुंबई, कोलकाता. थायलंड - बँकॉक, म्यानमार - याँगोन, व्हिएतनाम - हो ची मिन्ह व हाय फोंग
यापैकी अनेक शहरे आत्ताही पुरांचा सामना करत आहेत. परंतु विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पूरनियंत्रणाची क्षमता मर्यादीत आहे. जलप्रलयाखेरीज यापैकी अनेक शहरांना वादळांचा सामना करायला लागू शकतो अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.