शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मोदींंच्या ‘व्हिडीओ’ वरून उठले वादळ

By admin | Updated: May 13, 2014 04:22 IST

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

 नवी दिल्ली : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या ‘व्हिडीओ’त मोदी यांनी वाराणशीतील नागरिकांना एकता व बंधुतेच्या भावनेचे दर्शन करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय वाराणशीतील गंगाजमुना संस्कृतीचीदेखील प्रशंसा केली. दरम्यान, कॉंग्रेसने मात्र या ‘व्हिडीओ’वर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. वाराणशीतून निवडणूक लढणार्‍या मोदी यांनी या ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून गंगा मातेचा आशीर्वाद मागितला आणि या पवित्र शहराच्या परंपरेला कायम ठेवण्याचे लक्ष्य असायला हवे. निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात नागरिकांनी उत्साह व एकात्मतेच्या भावनेने मतदान करावे. वाराणशीचा सन्मान शांती, बंधुता आणि एकतेतच आहे. यालाच गंगा-जमुना संस्कृती असे म्हटले जाते. हीच बाब मतदानातदेखील झळकली पाहिजे असे ते म्हणाले. कोट्यवधी लोक इतक्या भीषण गरमीतदेखील निवडणूकांत उत्साहाने सहभागी होत आहे याचे पाश्चिमात्य देशांना या गोष्टीचे विश्लेषण करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘आप’ची निवडणूक आयोगावर टीका आम आदमी पक्षाने ‘व्हिडीओ’ दाखविणार्‍या वृत्तवाहिन्यांवर कडक ताशेरे ओढत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ज्या वृत्तवाहिन्यांनी मोदी यांचा ‘व्हिडीओ’ प्रसारित केला त्यांच्यावर आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. आयोगाच्या या भुमिकेमुळे मोठा धक्का बसल्याचे मत ‘आप’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे. ‘आप’ने देखील कॉंग्रेसची री ओढत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. संपूर्ण देशाला माहित आहे की मोदी हे वाराणशीतून निवडणूक लढत आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी मोदी यांचे भाषण करणे हा मतदारांना प्रभावित करण्याचाच प्रकार आहे. या तक्रारीनंतर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल आणि जनतेला तातडीची कारवाई पहायला मिळेल अशी टिप्पणी पत्रात करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता ही देशातील सर्व नागरिकांसाठी लागू असते. वृत्तवाहिन्या याला अपवाद नाहीत. निवडणूका स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात झाल्या पाहिजेत ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. परंतु उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना आयोगाने वृत्तवाहिन्यांवर कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही असा प्रश्न ‘आप’तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.