शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

रिंकू राजगुरू ठरली चित्रपट महिला कलाकार विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By admin | Updated: April 11, 2017 22:13 IST

आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू यंदाची चित्रपट महिला कलाकार विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरली.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 -  गेल्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीत बोलबाला राहिला तो सैराटचा. सैराटमधील आर्ची आणि परशाची लव्हस्टोरी सर्वांच्या मनाता घर करून गेली. त्याबरोबरच आर्ची अर्थात रिंकू राजगुरूच्या रुपात मराठी चित्रपटसृष्टीला एक गुणवान अभिनेत्रीही मिळाली. सैराटमधील जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रिंकूने महाराष्ट्रात आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. अशी ही आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू यंदाची चित्रपट महिला कलाकार विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरली.
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते रिंकूला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 
 
ज्यांचे सिनेमे पाहून (ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचे सिनेमे) मी मोठी झाले त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रिंकूनं व्यक्त केली. शिवाय, यावेळी जितेंद्र आणि रिंकूनं "ताकी ताकी ताकी रे..." या गाण्यावर ठेका धरल्यानंतर सोहळ्यात उपस्थितही नाचू लागले. 
  
या विभागात  रिंकूबरोबरच सोनाली कुलकर्णी (ज्युनियर), उर्मिला कानेटकर, सई ताम्हणकर आणि तेजश्री प्रधान यांनाही नामांकन मिळाले होते. पण रिंकूच्या नावावर चाहते आणि परीक्षकांनी  मोहोर  उमटवली. 
 
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू आहे. आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.  
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
facebook.com/lokmat
 
रिंकू राजगुरूविषयी थोडक्यात माहिती
गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या  "सैराट" चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झिंगाट कलेक्शन केले आणि या चित्रपटातील आर्चीची व्यक्तिरेखा साकारलेल्या रिंकू राजगुरूने पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांचे मन जिंकले. रिंकू राजगुरू ही सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये राहाणारी सर्वसामान्य मुलगी. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. "सैराट" चित्रपटातील आर्ची प्रचंड बिनधास्त, डॅशिंग मुलगी दाखवली आहे. जी बुलेट, तसेच ट्रॅक्टरही चालवते. या सगळ्या तिच्या विशेष गुणामुळे ती इतर मुलींपेक्षा वेगळी ठरते. आपल्या प्रेमाला घरातून विरोध होत असताना, आपल्या प्रियकराच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी आर्ची रिंकू राजगुरूने या चित्रपटात अतिशय ताकदीने उभी केली होती. प्रेमाच्या पूर्णत्वासाठी आर्चीने पुढाकार घेणे हे या व्यक्तिरेखेचे एक वेगळेपण ठरते. रिंकू राजगुरूने या चित्रपटात तिच्या वयापेक्षा अधिक समज आणि परिपक्वता दाखवली असून, अतिशय ताकदीने आर्ची ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिच्या वागण्या-बोलण्यात असलेली सहजता, तिच्या डोळ्यांमधली चमक, तिच्यातील नवखेपणा, यामुळे तिने आर्ची या व्यक्तिरेखेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. चित्रपटात तिचे व्यक्त होणे आणि त्यामधली असलेली निरागसता यात एक वेगळीच गंमत आहे. रिंकू ही वयाने अतिशय लहान असूनही पडद्यावर ज्या सराईतपणे वावरते, त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यातून तिचे अभिनय कौशल्य दिसून येते. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपली व्यक्तिरेखा समजून आणि त्यावर मेहनत घेऊन तिने अभिनय केला आहे. 
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com