शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडील बदल्यांचे अधिकार आता सचिवांकडे

By admin | Updated: June 24, 2016 05:07 IST

अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवड श्रेणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार महसूल विभागाच्या सचिव/प्रधान सचिवांना दिले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवड श्रेणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार महसूल विभागाच्या सचिव/प्रधान सचिवांना दिले जाण्याची शक्यता आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सद्यस्थितीत महसूलमंत्र्यांकडे आहेत, ते आता विभागीय आयुक्तांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महसूल विभागाचे आॅपरेशन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले असून, मुख्यमंत्री म्हणून महसूल खात्याबाबत असलेले बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची त्यांनी तयारी चालविली आहे. केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतील, असे म्हटले जाते. महसूल खात्याशी संबंधित सुनावण्या महसूलमंत्री वा महसूल राज्यमंत्र्यांकडे असतात. या सुनावण्या बरेचदा ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांचे कारण ठरतात. त्यामुळे या सुनावण्या मंत्रालयातून हद्दपार करून, त्या विभागीय आयुक्त वा जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील बदल्यांचे अधिकार खाली दिले, तर तो अधिक पारदर्शक निर्णय असेल, अन्यथा केवळ महसूलमंत्र्यांचे पंख छाटण्यासाठी निर्णय झाल्याची टीका होऊ शकेल. (विशेष प्रतिनिधी)