शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाबंदी कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार अन्न सुरक्षा अधिक-यांनाच

By admin | Updated: October 24, 2016 20:56 IST

गुटखा, सुगंधी पानमसाला यांवर लावलेल्या बंदीचे उल्लंघन प्रकरणी कारवाईचे अधिकार पोलिसांना नसून केवळ अन्न सुरक्षा अधिका-यांनाच आहेत

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद - अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी अन्न सुरक्षा कायदा कलम ३० अन्वये गुटखा, सुगंधी पानमसाला यांवर लावलेल्या बंदीचे उल्लंघन प्रकरणी कारवाईचे अधिकार पोलिसांना नसून केवळ अन्न सुरक्षा अधिका-यांनाच आहेत, असे परिपत्रक राज्य शासनातर्फे काढण्यात आले असून, आज एका अवमान याचिकेच्या  सुनावणीदरम्यान ते मुंबई उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आले.
गुटखाबंदीसंदभार्तील प्रकरणांमध्ये पोलिसांना कारवाईचे अधिकार नसून, अशी दाखल झालेली सर्व प्रकरणे मुंबई उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्या. इंदिरा जैन यांनी रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशात कारवाईच्या अधिकाराबाबत स्पष्ट निर्देशितही करण्यात आले होते. मात्र शासन आणि  अन्न सुरक्षा आयुक्त यांनी योग्य सूचना न दिल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल करणे, साठा पकडणे सुरूच ठेवल्याने राज्य शासनाचे संबंधित सचिव, अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या विरोधात उच्चं न्यायालय खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत मुख्य शासकीय अभियोक्ता  अमरजितसिंग गिरासे यांनी अन्न सुरक्षा आयुक्त यांचे १५ आॅक्टोबर २०१६ रोजी काढलेले परिपत्रक सादर केले. यानुसार कलम ३० च्या उल्लंघनाबाबत कारवाईचा अधिकार फक्त अन्न सुरक्षा अधिकारी  याना आणि तोही फक्त अन्न सुरक्षा कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकरणात भादंवि कलम ३२८ ही लावता येणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर २०१६ रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आर. आर. मंत्री आणि अ‍ॅड. आर. आर. संचेती काम पाहत आहेत.