शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पतीसारखा जीवनस्तर राखण्याचा अधिकार - मुंबई उच्च न्यायालय

By admin | Updated: May 12, 2016 16:20 IST

पत्नीलाही पतीसारखाच जीवनस्तर राखण्याचा अधिकार आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट याचिका फेटाळून लावली आहे.

राकेश घानोडे

नागपूर, दि. १२-  पत्नीलाही पतीसारखाच जीवनस्तर राखण्याचा अधिकार आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीच्या पोटगीविरुद्धची रिट याचिका फेटाळून लावली आहे.
 
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्वाळा दिला आहे. प्रकरणातील पती विकास हा नवी मुंबई तर, पत्नी सुमन अकोला येथील रहिवासी आहे. नागपूर कौटुंबिक न्यायालयाने सुमनला ५००० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. विकासचा या आदेशाला विरोध आहे. सुमन मासिक ४५०० रुपये वेतन मिळवित असल्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे होते. 
 
उच्च न्यायालयाने विकासचे म्हणणे खोडून काढले. सुमन मासिक ४५०० रुपये वेतन मिळविते हे गृहित धरले तरी ती आजच्या महागाईच्या काळात चांगला जीवनस्तर राखू शकत नाही. पत्नीलाही पतीसारखाच जीवनस्तर राखून जगण्याचा  अधिकार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही एवढ्या कमी रकमेत चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. 
 
यामुळे सुमनला स्वत:च्या उत्पन्नाला आधार म्हणून काही रक्कम मिळणे आवश्यक आहे. विकासचे मासिक वेतन पाहता त्याने सुमनला ५००० हजार रुपये पोटगी द्यावी या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात काहीच अतिशयोक्ती नाही असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.
 
अशी होती याचिका
कौटुंबिक न्यायालयाने पोटगी निश्चित करताना सुमनही अर्थार्जन करते हा मुद्दा विचारात घेतला नाही. सुमनच्या बँक खात्याच्या ‘स्टेटमेन्ट’वरून ती मासिक ४५०० रुपये वेतन मिळवित असल्याचे सिद्ध होते. यामुळे कौटुंबिक न्यायालयाचा आदेश अवैध ठरतो. बँक खात्याचे ‘स्टेटमेन्ट’ सादर करण्यासाठी व वादग्रस्त आदेशावर पुनर्विचार होण्यासाठी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात परत पाठविण्यात यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.