शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

२६ जानेवारीपासून माहिती अधिकार आॅनलाइन सुरु होणार

By admin | Updated: January 10, 2017 18:28 IST

राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे.

- राजू काळे

भार्इंदर, दि. 10  - राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे. राज्य सरकारने तसे निर्देश सर्व स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस यंत्रणांना दिले असुन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील केली आहे. यामुळे अर्जदारांना घरबसल्या माहिती अर्ज करुन माहिती मिळविता येणार आहे. तसेच संबंधित कार्यालयांना देखील निश्चित मुदतीतच अर्जदारांना माहिती द्यावी लागणार आहे. देशात डिजिटल युगाची सुरुवात झाल्याने राज्य सरकारने नागरीसेवा आॅनलाइन कार्यप्रणालीद्वारे देण्याला सुरुवात केली आहे. त्यातील काही सुरु झाल्या असुन काही सुरु केल्या जात आहेत. यातील महत्वाच्या आरटीआयला (माहिती अधिकार) आॅनलाइनच्या कक्षेत आणले जात आहे. त्याची सुरुवात २६ जानेवारीपासुन राज्यभर केली जाणार आहे. तत्पुर्वी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करताना अर्जदाराला थेट संबंधित कार्यालयात जावे लागत होते. त्यानंतर निश्चित मुदतीत माहिती घेण्यासाठी त्या कार्यालयाकडुन अर्जदाराला पाचारण केले जात होते. यात पोस्टाद्वारे अर्ज व माहिती देण्याची सुविधा देण्यात आली असली तरी त्याचा वापर कमी प्रमाणात होतो. पुरविण्यात येणा-या माहितीपोटी आवश्यक कागदपत्रांचे शुल्क आकारुन अर्जदाराला माहिती दिली जाते. हिच पद्धत आॅनलाइन पद्धतीवर अवलंबविण्यात येणार आहे. परंतु, वेळेत माहिती न मिळाल्याने अनेकदा अर्जदारांना अपिलात जावे लागते. त्यावरही अर्जदाराचे समाधान न झाल्यास तो माहिती आयोगाच्या राज्य व विभागीय आयुक्तांकडे दाद मागतो. त्यावेळी घेण्यात येणा-या सुनावण्यांसाठी तसेच माहिती वेळेत मिळविण्यासाठी अर्जदाराचा संबंधित कार्यालयात अनेकदा हेलपटा मारावा लागतो. त्यात त्याचा वेळ व पैसा वाया जातो. सध्या माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांचा व्याप वाढत असुन त्याचा दैनंदिन कामात मोठा तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. माहिती वेळेत मिळावी तसेच ती मिळविण्यासाठी अर्जदार थेट संबंधित कार्यालयात धाव घेत असल्याने कर्मचा-यांच्या कामात व्यत्यय येत असल्याचा दावा कर्मचारी व अधिका-यांकडुन केला जातो. यात प्रामुख्याने स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस (गृह विभाग) यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत अर्जाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे दैनंदिन कामाचा निपटारा तसेच माहिती देताना त्यात येणारे अडथळे दुर करण्यासह अर्जदारांना माहिती घेण्यासाठी थेट संबंधित कार्यालयात न जाता अर्जदाराला अर्ज करण्यासह माहिती मिळावी, यासाठी यासाठी राज्य सरकारने २६ जानेवारीपासुन आॅनलाइन कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० जानेवारीला जिल्हास्तरावर व्हिडीयो कॉन्फरन्सीद्वारे आॅनलाइन कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आल. १२ जानेवारीलाही त्याचे पुर्नसादरीकरण करण्यात येणार आहे.