शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीच्या रकमेसाठी शस्त्रक्रियेत ‘हेराफेरी’!

By admin | Updated: July 1, 2014 02:23 IST

अकोला येथील सिटी हॉस्पिटलमधील प्रकार; जीवनदायी योजनेतून रक्कम लाटण्यासाठी जीवघेणी शस्त्रक्रिया

सचिन राऊत / अकोलाराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी ५२ वर्षीय इसमावर पाठीच्या मणक्यांची जीवघेणी शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताच या इसमाच्या पाठीत टाकण्यात आलेले स्क्रू काही वेळातच काढल्याने या शस्त्रक्रियेत मोठी हेराफेरी झाल्याचे वास्तव काही डॉक्टरांकडून माहिती घेतल्यानंतर उजेडात आले आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ यांना पाठीचा त्रास असल्याने १४ मे रोजी रामदास पेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी उपचार करून दुसर्‍याच दिवशी १५ मे रोजी पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आल्याचे डॉ. गडपाल व डॉ. महाशब्दे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले व तसे एक्स-रेमध्येसुद्धा दाखवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी वाघ यांना पाठीचा त्रास वाढल्याने उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात आणले. यावेळी डॉ. महाशब्दे यांनी तपासणी केली; मात्र पुढील उपचारासाठी डॉ. गडपाल यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. वाघ यांना तातडीने डॉ. गडपाल यांच्याकडे नेण्यात आले. नेमके याचवेळी ते बाहेरगावी असल्याने रुग्णास अन्य एका डॉक्टरांकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरने पुन्हा एमआरआय व एक्स-रे काढले असता त्यांच्या पाठीत स्क्रू नसल्याचे आढळल्याने त्यांनी उपचार करण्याचे टाळले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना आधीच्या शस्त्रक्रियेमध्ये हेराफेरी झाल्याची शंका आली. २३ जून रोजी वाघ यांना पुन्हा डॉ. गडपाल यांच्याकडे नेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरचे स्क्रू शस्त्रक्रिया केल्यानंतर लगेच काढल्याचे सांगितले. वाघ यांचा त्रास कमी न होता वाढतच असल्याने डॉ. गडपाल यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून २५ जून रोजी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगून ३0 हजार रुपये जमा करण्याचे सांगितले; मात्र वाघ यांच्या नातेवाइकांनी रक्कम जमा न करता रुग्णालयातून सुटी घेतली. त्यानंतर त्यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.