शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन सर्वेक्षणानंतर ठरणार रिक्षा-टॅक्सीचे दर

By admin | Updated: April 30, 2017 03:20 IST

राज्यातील आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीतर्फे ग्राहक, रिक्षा व टॅक्सीचालक, आॅटोरिक्षा व टॅक्सी युनियन यांच्याकडून भाडेदरासंदर्भात

मुंबई : राज्यातील आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीतर्फे ग्राहक, रिक्षा व टॅक्सीचालक, आॅटोरिक्षा व टॅक्सी युनियन यांच्याकडून भाडेदरासंदर्भात आॅनलाइन अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुसार १५ मेपर्यंत आलेल्या सूचनांच्या सर्वेक्षणानंतरच आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडेदर सूत्र ठरविले जाईल, अशी माहिती आॅटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर सूत्र समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ आणि राज्य परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.नरिमन पॉइंट येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात शनिवारी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील आॅटोरिक्षा/टॅक्सी भाडेसूत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने विविध ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. मात्र, समितीला विविध मुद्द्यांवर रिक्षा तसेच टॅक्सीचालक, रिक्षा व टॅक्सी युनियन आणि ग्राहक यांच्या मतांमध्ये भिन्नता आढळली आहे. त्यामुळे या सर्वांची मते विचारात घेतल्यानंतर व्यापक प्रमाणावर आॅटोरिक्षा व टॅक्सी व्यावसायिक, त्यांच्या संघटना, तसेच प्रवाशांना भाडेवाढीसंदर्भातील त्यांची मते समितीकडे मांडता यावीत, यासाठी आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत प्रवाशांसह आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचालक, संघटनांनी अभिप्राय नोंदवावेत, असे सांगण्यात आले आहे. या अभिप्रायानंतरच रिक्षा-टॅक्सींचे दर ठरवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अभिप्राय नोंदविण्यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत. एक व्यक्ती फक्त एकच अभिप्राय देऊ शकेल. सर्वेक्षणामध्ये चार प्रकारचे अर्ज आहेत. ते पुढीलप्रमाणे :१. जनतेचा अभिप्राय२. आॅटोरिक्षा चालक अभिप्राय३. टॅक्सीचालक अभिप्राय४. आॅटोरिक्षा/टॅक्सी संघटनांचा अभिप्राय ई-व्हेईकल्ससोबतही स्पर्धा- आॅटोरिक्षा आणि टॅक्सींची सध्या ओला-उबरसोबत स्पर्धा सुरू आहे. येत्या काळात रिक्षा-टॅक्सींना ई-व्हेइकल्ससोबतसुद्धा स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी रिक्षा-टॅक्सींचे भाडेदर नियंत्रित असणे, त्यांचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षणही तितकेच गरजेचे आहे, अशी माहिती अ‍ॅटोरिक्षा/टॅक्सी भाडेदर सूत्र समितीने दिली.फसवणूक होणार नाहीआॅटो रिक्षासह टॅक्सी, ओला, उबर, शेअर टॅक्सी, शेअर रिक्षा या सर्वांसाठी भाडे दर ठरवून दिले आहेत. परिणामी प्रवाशांची फसवणूक होणार नाही, असे समितीने सांगितले.जून अखेरीस सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून शासनाकडे सुपुर्द करण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेण्यात येतील. भाडेदर आणि भाडेदराची तत्त्वे ठरविण्यासाठी आम्ही अभिप्राय मागवीत आहोत.- प्रवीण गेडाम, राज्य परिवहन आयुक्त