शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बंदमुळे आज होणार हाल

By admin | Updated: February 15, 2016 08:20 IST

ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्यांवर आणि अवैध वाहनांवर बंदी घालावी, यासह अन्य मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे

मुंबई : ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्यांवर आणि अवैध वाहनांवर बंदी घालावी, यासह अन्य मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद मुंबईपुरताच असल्याचे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले. बंदमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा सहभागी होणार असल्याने, उपनगरवासीयांचे हाल होण्याची शक्यता आहे. अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही, ती रोखण्यात शासनाला अपयश आले आहे, असा आरोप मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून करण्यात आला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, आॅटोरिक्षांच्या १ लाख नवीन परवान्यांचे वितरण त्वरित करावे, रिक्षा चालक-मालकांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा मिळावा, त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, त्यांना कमी दरात घरे द्यावीत, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लायसन्स धारण करणाऱ्यांना त्वरित बॅच द्यावा, नूतनीकरणासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील विजेता आॅटोरिक्षा चालकांकडून १५ हजार आणि अन्य विभागांतील चालकांकडून १० हजार रुपये घेण्याची अट रद्द करण्यात यावी, अशा मागण्या युनियनने परिवहन विभागाकडे केल्या आहेत. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, बंदमध्ये ८३ हजार रिक्षा सामील होतील. परिवहन आयुक्तांशी चर्चा होणार आहे. मुंबईतील आरटीओकडेही युनियनचे सदस्य मागण्या सादर करतील. ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू. (प्रतिनिधी)