शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रिक्षाचालकांचा उद्दामपणा सुरूच, पुन्हा एकदा तरुणीला मारहाण

By admin | Updated: July 7, 2017 14:56 IST

ठाण्यात रिक्षाचालकांच्या उद्दामपणाला पारावार उरला नाहीये.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 7 - ठाण्यात रिक्षाचालकांच्या उद्दामपणाला पारावार उरला नाहीये. कालच रिक्षाचालकाकडून तरुणीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला असतानाच आता पुन्हा एकदा रिक्षाचालकानं एका तरुणीला मारहाण केली आहे. त्यामुळे ठाण्यात दिवसेंदिवस रिक्षाचालकांच्या मुजोरीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गावदेवी परिसरातून चरई येथे कामावर जात असताना रिक्षाचालकाने दुसऱ्या बाजूने रिक्षा नेली. त्यावेळीच संतापलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला याचा जाब विचारला. रिक्षाचालक उद्दामपणा दाखवत त्या तरुणीच्या अंगावर धावून गेला आणि तिला मारहाण केली. संतापाच्या भरात त्या रिक्षाचालकाने तरुणीच्या थेट श्रीमुखात भडकावली. त्यानंतर रिक्षाचालकानं त्या तरुणीला जबरदस्त मारहाण केल्यामुळे ती जागच्या जागीच कोसळली. या प्रकाराची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कालच एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिकंदर निसार शेख (28, रा. राबोडी) याला बेड्या ठोकल्या होत्या. तसेच ठाणे स्थानक सॅटीस परिसरात अन्य एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या शशिकांत सावंत (30, रा. डोंबिवली) या दोघांनाही ठाणे नगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती.

आणखी वाचा

पहिली घटना बुधवारी रात्री ठाणे सॅटीस ब्रिजखाली घडली होती. ठाण्यातील कंपनीत नोकरीला असलेली 25 वर्षीय तरुणी घरी जाण्यासाठी सॅटीस पुलाखाली उभी असताना दादरच्या हेल्थ केअरमध्ये नोकरीला असलेल्या शशिकांतने विनयभंग केल्याचा आरोप तिने केला. आपला या तरुणीला चुकून धक्का लागल्याचा दावा त्याने केला. तो नशेत असल्याने त्याने जाणूनबुजून विनयभंग केल्याचा आरोप करून या तरुणीने त्याच्या श्रीमुखातही लगावली. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
दुसऱ्या घटनेत राबोडीच्या शिवाजीनगर येथील सिकंदर शेख या रिक्षाचालकाने नौपाड्यातील 25 वर्षीय तरुणीला अलोक हॉटेलच्या जवळ रात्री नजरेने इशारा करून विनयभंग केला होता. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली. त्याने चूक कबूल करण्याऐवजी या तरुणीलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तिनेही न डगमगता त्याचा प्रतिकार करून आरडाओरडा केल्याने नागरिकांनीही त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.