शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परमिटसाठी आठवी पास हवीच

By admin | Updated: February 9, 2015 05:12 IST

रिक्षा परमिटसाठी आठवी पासची अट शिथिल करणार नाही. परमिट व परवाना हवा असेल, त्या रिक्षाचालकांनी यशवंतराव चव्हाण

कोल्हापूर : रिक्षा परमिटसाठी आठवी पासची अट शिथिल करणार नाही. परमिट व परवाना हवा असेल, त्या रिक्षाचालकांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अथवा प्रौढ साक्षरता वर्गात प्रवेश घ्यावा व किमान दहावी पास व्हावे, अशा कानपिचक्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षाचालक संघटनांना दिल्या. ते रविवारी शासकीय विश्रामगृह येथील परिवहन कार्यालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध रिक्षाचालक संघटनांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन रावते यांना देण्यात आले. या निवेदनात परमिटसाठीचे धोरण शासनाने बदलावे; यामध्ये आठवी पासची अट शिथिल करावी, ही प्रमुख मागणी होती. सर्व नागरिक साक्षर व्हावेत म्हणून राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे ही मागणी मी मान्य करणार नाही. रिक्षाचालकांनी व्यवसायातून वेळ काढून मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन दहावी पास व्हावे, असा सल्ला रावते यांनी रिक्षाचालकांना दिला. अवैध वाहतुकीबाबत येत्या आठ दिवसांत बैठक बोलाविण्यात येईल. रिक्षा पासिंगबाबत प्रतिदिन पाच रुपये लेट फी आकारली जाते. ती कमी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच रिक्षाचालकांनीही आपले वाहन सुस्थितीत ठेवावे व आपल्या गाडीचा विमा पूर्ण उतरावा. त्याचा फायदा प्रवाशांनाही मिळेल, अशी सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)