शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे सोमवारी धरणे

By admin | Updated: May 21, 2016 03:54 IST

रेल्वे स्थानक परिसराचे असताना अन्य वाहनांच्या अवैधपणे होणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा युनियन सोमवार, २३ मे रोजी धरणे धरणार आहे.

कल्याण : उदंड जाहले रिक्षा स्टॅण्ड, असे काहीसे चित्र डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसराचे असताना अन्य वाहनांच्या अवैधपणे होणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा युनियन सोमवार, २३ मे रोजी धरणे धरणार आहे. पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात हे आंदोलन होणार आहे. रामनगर रिक्षा स्टॅण्ड, केळकर क्रॉस रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी सर्कल, मानपाडा रोड, चार रस्ता, नामदेव पथ क्रॉस रस्ता, शिवमंदिर चौक, एस.के. पाटील शाळा चौक, महात्मा फुले चौक, विष्णूनगर टपाल कार्यालयाचा चौक, दीनदयाळ चौक, स्टार कॉलनी, साईबाबा मंदिर चौक, मानपाडा पेट्रोलपंप चौक या ठिकाणी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. पाटकर रोड, नेहरू रोड, चिमणी गल्ली, केळकर रोड, सुभाष रोड या अधिकृत रिक्षा स्थानकांत बेकायदा पार्क होणाऱ्या अन्य वाहनांवर कारवाई करा आणि अधिकृत रिक्षा स्टॅण्ड पार्किंगमुक्त करा. डोंबिवली पूर्वेकडील पूर्व-पश्चिम स्थानकांलगतच्या परिसरात ‘परतीचे प्रवासी येथे उतरावेत’असे फलक लावावे. मानपाडा रोडने रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रिक्षांना इंदिरा गांधी सर्कलमार्गे कॅनरा बँकेसमोर परतीचे प्रवासी सोडण्यास मंजुरी द्यावी, कालबाह्य रिक्षा बंद कराव्यात, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या समितीने सर्वेक्षण केल्यानुसार मीटर आणि शेअर पद्धतीने चालवणाऱ्या अधिकृत रिक्षा स्थानकाचे फलक लावावेत तसेच शेअरचे दरपत्रक लावावे, कल्याण आरटीओ कार्यालयात दलालांमार्फत खुलेआम सुरू असलेली रिक्षाचालकांची लूट बंद करा, अशा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या आणि आरटीओच्या भ्रष्ट व कर्तव्यशून्य कार्यपद्धतीविरोधात हे आंदोलन असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)