शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३१ आॅगस्टला रिक्षा चालकांचा संप

By admin | Updated: August 5, 2016 18:40 IST

मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व ऊबेर यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व ऊबेर यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

राव म्हणाले की, अवैध वाहतुकीचे पुरावे देत युनियनने १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे दिले होते. मात्र त्यानंतरही शासनाने युनियनची एकही मागणी पूर्ण केलेली नाही. शिवाय मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीसुद्धा झालेली नाही. उपनगरांत टाटा सुमो, तवेरा, इंडिका आणि खाजगी बसेससारख्या वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यांमुळे प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने उपनगरांत अवैध वाहतूक फोफावली आहे. याशिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरांत हजारो रिक्षा चालक विनाबॅज रिक्षा चालवत आहेत.

ज्या चालकांनी तीन वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालवण्याचा परवाना धारण केला आहे, त्यांना विनाविलंब बॅज देण्यात यावा. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालकांना सन्मानाने धंदा करता येईल, असेहीत्यांनी सांगितले.ओला, उबेर सारख्या अ‍ॅग्रीग्रेटर्ससाठी कायदे व नियम तयार करण्यात राज्य सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे. राव म्हणाले की, १७ जून, २०१५ रोजी युनियनने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने प्रारुप नियम (ड्राफ्ट रूल्स) तयार करत, त्यांवर ३१ आॅक्टोबर २०१५ पूर्वी हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र या गोष्टीला १० महिने उलटल्यानंतरहीअग्रीग्रेटर्ससाठी कोणतेही नियम अथवा कायदा लागू करण्यात आलेले नाहीत.

एकीकडे रिक्षा चालकांवर कारवाई करायची, तरी दुसरीकडे कोणत्याही नियमाशिवाय रस्त्यावर वावरणाऱ्या अ‍ॅग्रीग्रेटर्सला अभय द्यायचे, हा शासनाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राव यांनी केला आहे.८ आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहिम!मुंबई पश्चिम आणि पूर्व उपनगरांत ८ आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहिम घेण्याची घोषणा युनियनने केली आहे. हजारो रिक्षा चालकांच्या स्वाक्षऱ्या ३१ आॅगस्टपर्यंत जमा केल्या जातील. त्यानंतर ३१ आॅगस्टला धंदा बंद ठेवून हजारो रिक्षा चालक आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील. यावेळी हजारो स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्रीयांना सादर केले जाईल.रिक्षा चालक-मालकांच्या प्रमुख मागण्या -अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर निर्बंध आणावेत.तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आॅटोरिक्षाचा परवाना असलेल्या चालकांना बॅज देण्यात यावे.ओला, उबेर यांसारख्या अग्रीग्रेटर्सवर तत्काळ बंदी घालावी.आॅटोरिक्षा चालक व मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी.मुंबईच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी आॅटोरिक्षाचे नवीन एक लाख परवान्यांचे वितरण करावे.