शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना मराठी सक्तीची!

By admin | Updated: November 18, 2016 07:27 IST

सार्वजनिक वाहतूकदारांना प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे.

रिक्षाचालकांना मराठी सक्तीची!मुंबई : सार्वजनिक वाहतूकदारांना प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे. अन्यथा त्यांना प्रवाशांनी दिलेल्या सूचना कळणार नाहीत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने परिवहन विभागाने रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकावर स्थगिती देण्यास नकार दिला. परिवहन विभागाने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाला मीरा-भार्इंदर रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियनने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.या परिपत्रकानुसार, सर्व रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. मराठी भाषा न येणाऱ्याला परवाना न देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या परिपत्रकामुळे अनेक रिक्षावाल्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही. राज्य सरकार मराठी भाषेची सक्ती करू शकत नाही. हे परिपत्रक बेकायदेशीर असल्याने ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.सरकार अशा प्रकारे रिक्षाचालकांवर मराठी भाषेची सक्ती करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या परिपत्रकावर स्थगिती दिली असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या परिपत्रकावर स्थगिती द्यावी, अशी मागणीही या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.उच्च न्यायालयाने रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची स्वत:हूनच दखल घेतली. रिक्षाचालक महिला प्रवाशांशी गैरवर्तन करीत असल्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात येतात. अशा तक्रारींना हाताळण्यासाठी परिवहन आयुक्तांनी आत्तापर्यंत काय पावले उचलली आहेत? तसेच अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांवर काय कारवाई केली आहे?, अशी विचारणा करीत खंडपीठाने परिवहन विभागाला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तर याचिकाकर्त्या संघटनेच्या अध्यक्षांनाही पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)