दगडू तायडे / जनुना (जि. बुलडाणा) : गंभीर आजार व त्यावरील वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणार्या गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावे यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य आरोग्य योजना राबविली जाते. ही योजना केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच होती. गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा फायदा यापुढे पांढर्या रेशनकार्डधारकांना म्हणजेच श्रीमंतांनासुद्धा होणार आहे. या योजनेमध्ये 0 ते १८ वयोगटातील मुले लाभार्थी ठरणार आहेत. या नव्या योजनेंतर्गत १0४ प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम अंतर्गत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णालयासोबतच हा सामंजस्य करार झाला असून, ही योजना लवकरच राज्यात लागू होणार आहे. दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) व दारिद्रय़रेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटिल आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २0१३ पासून संपूर्ण राज्यात ह्यराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाह्ण सुरू केली. या योजनेत जटिल शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. यात ३0 प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७२ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ही योजना पांढर्या रेशनकार्डधारकांसाठी नव्हती; मात्र लहान मुलांमध्ये वाढते गंभीर आजार लक्षात घेता शासनाने ही योजना व्यापक करण्याचे उद्देशाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थी वाढणार आहे.
श्रीमंतांनाही मिळणार ‘जीवनदायी’चा लाभ
By admin | Updated: June 1, 2015 01:59 IST