शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचे उत्पादन घटणार?

By admin | Updated: November 15, 2015 02:19 IST

हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे.

पुणे : हवामान बदलाचा फटका यंदाही थंडीला बसणार असून, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असे भाकीत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविले आहे. रब्बीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी थंडी यंदा कमी पडणार असल्यामुळे, त्याचा पिकांवर परिणाम जाणवण्याची शक्यता असल्याने, त्यामुळे धान्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे, अशी माहिती साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे दोन वर्षांपासून थंडी जाणवलीच नाही आणि यंदाही थंडी कमीच राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली. जागतिक तापमान वाढीमुळे काही वर्षांपासून हवामानात बदल होत आहे. दोन वर्षांत जाणवण्याइतकी थंडी पडलीच नाही. ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस, अशी स्थिती राहिली आहे. यंदाही डिसेंबर अखेरपर्यंत काही प्रमाणात अवेळी पाऊस पडेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाशिकच्या भागातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात होते. अवेळी पावसाचा त्यावर दोन-तीन वर्षांपासून परिणाम होत आहे.पूर्वी नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे ४ महिने थंडी असायची. १२० दिवसांची थंडी रब्बीतील पिकांसाठी योग्य ठरायची. ४० वर्षांपूर्वी डिसेंबर अखेरच्या सप्ताहात प्रचंड प्रमाणात थंडी असायची. मात्र, आता सर्वाधिक थंडीचा काळ म्हणून जानेवारीचा दुसरा-तिसरा आठवडा गृहित धरला जातो. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.अचानक जास्त थंडी पडणे किंवा एकदम थंडी कमी होणे, हे रब्बीसाठी घातक आहेत. कोणतीही टोकाची स्थिती पिकांना अपायकारक आहे. ७ जानेवारी २०११ रोजी नगरमध्ये १.६ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. त्याचवेळी नाशिकमध्ये ० अंश सेल्सियस तापमान होते, याचा द्राक्षांच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. गव्हाच्या पिकाला साधारणत: १२०-१३० दिवस थंडीचा कालावधी लागतो. या संदर्भात ‘डिग्री डेट’ ही संकल्पना वापरली जाते. प्रत्येक दिवसाला कमाल-किमान तापमानात १ अंशानेही बदल झाला, तरी त्याचा पिकावर परिणाम होतो. गेल्या १५ वर्षांचा कालावधी पाहता, गव्हाला चांगली थंडीच मिळालेली नाही. १ अंशानेही कमाल तापमान वाढले की उष्णता मिळून १०० दिवसांतच पीक तयार होते, पण त्यातील उत्पादनता घटते, दाणे कमी होतात. गव्हाचे क्षेत्र वाढविण्याऐवजी ज्वारी, हरभरा असे क्षेत्र घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)