शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलेट ट्रेन’साठी ‘समृद्धी’सारखा मोबदला - रावते यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:59 IST

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले. शिवाय, या प्रकल्पासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे प्रकल्पाच्या मार्गावरील आदिवासी पट्ट्यात उद्योगधंदे उभे राहतील, तसेच हा मार्ग मुंबई ते ठाण्यापर्यंत जमिनीखालून जाणार असल्याने, शेतकºयांची जमीन जास्त प्रमाणात संपादित होणार नाही. मात्र, भूसंपादन झालेल्या शेतकºयांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य मोबदला मिळेल, असे रावते यांनी सांगितले.बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प सुमारे एक लाख कोटी रुपयांचा असून, त्यासाठी ८० टक्के कर्ज जपानी बॅँकेकडून मिळणार आहे, तर २० टक्के हिश्श्यापैकी केंद्र सरकार १० टक्के, तर उर्वरित १० टक्के हिस्सा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा असणार आहे. जपानी बॅँकेचे कर्ज ५० वर्षांसाठी असून, पहिल्या १० वर्षांसाठी कर्जफेड करावी लागणार नाही, तसेच राज्याला सुरुवातीला १२५ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी माहिती रावते यांनी दिली. या बुलेट ट्रेनचे भाडे विमानाच्या तिकिटापेक्षा दीडपट असेल. मात्र, विमानाने जाण्या-येण्यात जो संपूर्ण वेळ जातो, त्यापेक्षा ही ट्रेन लवकर पोहोचणार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातली जमीन देण्यात आलेली नाही. संकुलातली चाळीस हजार वर्गमीटर जमीन देण्याचा सरकारचा विचार आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांनी केलेला आरोप रावते यांनी फेटाळून लावला.मुंबई-कोलकाता बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक-औरंगाबाद-अमरावती -नागपूरमार्गे नेण्यात यावा, अशी केंद्र सरकारला सूचना करण्यात आली असून, याचे सर्वेक्षण स्पॅनिश कंपनीकडून सुरू असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित करत, प्रकल्प फक्त धनदांडग्यांसाठी असल्याचा आरोप केला होता.नीलम गोऱ्हे  यांचा रावतेंना सवालएकीकडे दिवाकर रावते बुलेट ट्रेनची आवश्यकता सांगत असताना, शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मात्र, हा प्रकल्प म्हणजे मराठी नागरिकांच्या हितावर अंधारात मारलेली कुºहाड असल्याचा आरोप केला. बुलेट ट्रेनवाल्यांसाठी पार्किंगची सोय कुठे करणार, मुंबईत आधीच घरे महाग आहेत. बुलेट ट्रेनऐवजी दुसरा काही पर्याय आहे का, असे विचारत, फक्त हिरे व्यापाºयांच्या सोयीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.