शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आव समाजकार्याचा, पण धंदा लुटण्याचा!

By admin | Updated: November 15, 2014 00:13 IST

आरोपींसाठी कधी विनवणी, तडजोड आणि कधी कारवाईच होऊ नये यासाठी वारंवार हेलपाटे मारून पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करणारे दलाल मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत.

पिंपरी : आरोपींसाठी कधी विनवणी, तडजोड आणि कधी कारवाईच होऊ नये यासाठी वारंवार हेलपाटे मारून पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करणारे दलाल मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. पोलिसांशी असलेल्या संबंधांचा, परिचयाचा फायदा उठवून आरोपींच्या नातेवाईकांकडून पैसे उकळणारे स्वयंघोषित कार्यकर्ते दलाल आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. 
 
विविध प्रकारच्या परवानग्या घेणो असो अथवा पीडिताचे म्हणणो वरिष्ठ अधिका:यांकडे मांडणो, गुन्ह्यात आरोपी असला तरीही आरोपीच कसा निदरेष आहे हे पोलिसांना पटवून देणो आदी कामांसाठी स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे ‘दलाल’ पोलीस ठाण्याच्या आवारात पहायला मिळतात.  हे दलाल चांगली मलईदेखील लाटतात.
आरटीओ, रेशनिंग कार्यालय, एमएसईबी कार्यालय अशा ठिकाणी नेहमीच दलालांचा सुळसुळाट दिसून येतो. आता अशाच प्रकारचे दलाल पोलीस ठाण्याच्या आवारातही वावरू लागले आहेत. स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणारेच पोलिसांकडे मध्यस्थी करून दलालीचे उद्योग करू लागले आहेत. 
भुरटय़ा चो:या, झोपडपट्टीत होणा:या छोटय़ा मोठय़ा हाणामारीच्या घटना या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते दलालांसाठी उत्पन्नाचे मार्ग ठरत आहेत. पोलिसांनी कोणाला पकडल्यास, चौकशी केल्यास मध्यस्थी करून साहेबांशी आपली चांगली ओळख आहे. काळजी करू नका, प्रकरण मिटवतो, असे आश्वासन देऊन ते संबंधित आरोपीच्या नातेवाईकाकडून पैसे घेतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर साहेब आपलाच कार्यकर्ता आहे, सोडून द्या, अशी विनवणी करतात. अथवा कारवाई शिथिल करण्यास सांगतात. पोलिसांनी प्रतिसाद दिल्यास हा सामाजिक कार्यकर्ता साहेबांना चहापाण्याचा खर्च द्यायचा आहे. अशी सबब पुढे करून संबंधितांकडून पैसे उकळतो. कधी पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देऊन पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला जातो. एखाद्या आरोपीसाठी आंदोलन करण्याची सुपारीसुद्धा हे दलाल घेतात. 
वारंवार विविध कामानिमित्त येणा:या या दलालांबरोबर पोलिसांचीही चांगलीच गट्टी जमलेली आहे. वेगवेगळ्या प्रकरणांचा समेट घडवून आणण्यासाठी येणा:या त्याच त्याच सामाजिक कार्यकत्र्याना पोलीससुद्धा हटकत नाहीत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
पिंपरी-चिंचवड शहरातील परिमंडळ तीनच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी, वाकड असे आठ पोलीस ठाणो आहेत. रोजच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत असतात. तसेच विविध प्रकारच्या परवानग्या, दैनंदिन गुन्हे आणि जुन्या गुन्ह्याबाबतच्या तपासाबाबत विचारणा करण्यासाठी येणारे नागरिक यामुळे ठाण्यांमध्ये वर्दळ असते. मात्र, पोलिसांशी संबंधित असणारी विविध प्रकारची कामे करुन देण्यासाठीचे दलालही पोलीस ठाण्याच्या परिसरात वावरत असतात. यामध्ये तथाकथित सामाजिक कार्यकर्तेच अधिक असतात. पोलीस अधिकारी, कर्मचा:यांसोबत राहून दलाल त्यांच्याशी सलगी करतात. 
तसेच सामान्य नागरिकालाही स्वत:ची आणि पोलिसातील सलगी दाखविण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रय} केला जातो. 
पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हटले जाते.  पोलीस ठाणो म्हटले की सामान्यांच्या अंगावर काटे येतात. अशातच एखाद्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून वाद झाला अथवा समोरच्याची चुकी असल्यास पोलीस ठाण्यात जावे लागते. ठाण्यात कोणाला भेटायचे, तक्रार कोणाकडे द्यायची, चुकी नसल्यास कोणाकडे आपले मत मांडायचे याबाबत सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. ठाण्यात कधी कधी तर तक्रारच गडबडून गेलेला असतो. अशाच व्यक्तींना तथाकथित ‘सामाजिक कार्यकर्ते’ गाठतात. बहुधा पोलीस ठाण्याच्या आवारात अशा दलालांचा वावर दिसतो. (प्रतिनिधी)
 
मनाप्रमाणो वर्गणी
4झोपडपट्टी भागातील अथवा आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या नागरिकांचे प्रकरण असल्यास पाचशे, हजार रुपये घ्यायचे. समोरची पार्टी ‘तगडी’ दिसल्यास दलालाकडून मनाप्रमाणो रकमेची मागणी केली जाते. हे स्वयंघोषित कार्यकर्तेरुपी दलाल दिवसाला किमान दीड ते दोन हजार रुपयांची मलई लाटतात. 
4दलाली करून पैसे मिळविलेले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते काही कालावधीतच चारचाकी मोटारीत फिरतात. गळ्यात सोनसाखळी, हातांच्या बोटांमध्ये दोन-तीन अंगठय़ा, महागडा गॉगल अन् खादीचे कपडे परिधान करुन दिवसभर कधी पोलीस ठाण्याच्या आवारात तर कधी कार्यकत्र्यांच्या गराडय़ात असतात. या दलालांची भेट घेण्याची अथवा चर्चा 
करण्याची ठिकाणोही चांगल्या हॉटेलांमध्ये आहेत. 
 
अधिका:याशी 
ओळख..
4तुमची काय समस्या आहे, कोण त्रस देतंय, पोलिसात तक्रार द्यायची का, अशाप्रकारे विचारपूस करुन एजंट संबंधित प्रकरण हाताळायला घेतात. माझी वरिष्ठ अधिका:याशी ओळख आहे. तुमचे काम करून देतो, असे विश्वासाने सांगतात. तसेच यासाठी काही रकमेची आवश्यकता असल्याचे सांगत हे दलाल मलई लुटतात. 
 
दलालच घालतात भीती
प्रकरण गंभीर आहे, तुमच्या अंगलट येऊ शकते, अशा प्रकारची भिती घालून काही दलाल पीडित व्यक्तीलाच अक्षरश: घाम फोडतात. यामुळे भेदरलेल्या अवस्थेतील पीडित व्यक्ती मागितलेली रक्कम  दलालाच्या हातावर ठेवून प्रकरण हाताळण्याची दलालाच विनंती करतात.
 
विश्वास नंतर घात
शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकत्र्याचा दिनक्रम ठरलेला असतो. रोजच शहरातील काही नागरिकांना गाठायचे आणि आपणच त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, असे चित्र निर्माण करतात. विश्वासात घेऊन मलईही लाटायची, असा उद्योग या दलालांचा सुरू असतो. 
 
आंदोलनाचा मार्ग
तथाकथित सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जातात. मात्र, त्याठिकाणी त्यांना अधिकारी अथवा कर्मचा:यांकडून दाद न दिल्यास छोटय़ा-मोठय़ा आंदोलनाचा मार्ग निवडला जातो. चार-दोन कार्यकत्र्याना सोबत घेऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रय}ही केला जातो. 
 
दलालांचा वापर
ठाणो म्हटले की पोलिसांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती ठरलेली असते. सामान्य नागरिकाला पोलिसांकडून मिळणारी वागणूक आणि त्यांची जड भाषेतील उत्तरे यामुळे अनेकजण किरकोळ कामासाठीदेखील स्वत: पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी दलालांमार्फतच कामे करुन घेणो सोयीचे समजतात. कधी स्वत: अनुभव घेतल्याने तर कधी इतरांकडून ऐकल्याने थेट पोलीस ठाण्यात जाणोच टाळतात. 
 
निवेदनाचा धंदा
छोटी-मोठी संघटना स्थापन करायची, कसलाही नोंदणीक्रमांक नसलेले लेटरहेड तयार करायचे. सतत पोलिसांना वेगवेगळ्या विषयांसंदर्भात निवेदने द्यायची. सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग असल्याचे या पत्रतून दाखवून द्यायचे. मात्र, अशाप्रकारच्या बोगस पत्रंच्या जोरावर  तथाकथित ‘सामाजिक कार्यकर्ते’ आपली पोळी भाजून घेतात. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी असला तरीही त्याच्या बाजूने उभे राहत ‘दलाल’ तडजोडीसाठी पोलीस ठाण्यात येतात. तसेच साधा परवाना असो की ना हरकत प्रमाणपत्र याप्रकारची कामेही दलालांमार्फत केली जात आहेत.