शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती दिवस : ९ ऑगस्ट क्रांतीचा जयजयकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 06:54 IST

आज ९ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला.

- प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. ९ : आज ९ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाव चा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता. तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या कॉंग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही, हेही महत्त्वाचे आहे. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे. १९४२ च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्थानचा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. कॉंग्रेसच्या त्या प्रस्तावात, हिंदुस्थानातली ब्रिटिश राजवट ताबडतोब संपुष्टात आली पाहिजे. हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे केवळ त्याच्याच हिताचे नसून सार्‍या जगाचेही हित त्यात सामावलेले आहे. हुकूमशाही, साम्राज्यशाही, लष्करशाही आदी अनिष्ट प्रवृत्तींशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे. असे म्हटले होते. त्यावेळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी ७ ऑगस्ट १९४२ ला या प्रस्तावाच्या कॉंग्रेस महासमितीच्या मंजुरीसाठी मुंबईला अधिवेशन बोलावले होते. कार्यसमितीच्या प्रस्तावाला महासमितीनेही प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला होता.

महात्मा गांधींच्या नेतृत्वात इंग्रज सरकारविरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर देशभर अहिंसक जनआंदोलन लवकरच उभे राहील, अशा शब्दांत महासमितीने आपला निर्धार व्यक्त केला होता. इंग्रज सरकारला स्वातंत्र्यवीरांच्या या ह्यचले जावह्ण ठराववजा आदेशात १८५७ च्या सशस्त्र बंडांची बीजे दिसली होती. त्यामुळेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांना ९ ऑगस्टच्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक करून अज्ञातस्थळी रवाना केले होते.

कॉंग्रेस महासमिती सदस्य सकाळी ९ वाजता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजासाठी गोवालिया टँक मैदान या अधिवेशनस्थळी जमले तेव्हा त्यांना प्रमुख नेत्यांच्या अटकेची बातमी कळली. सरकारच्या या अटकसत्रामुळे संपूर्ण देशातच संतापाची लाट उसळली. नेते नजरेआड झाले तरी आपण चले जाव आंदोलन चालूच ठेवू, असा निर्धार जागोजागी जाणवू लागला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा उरलासुरला धाकही जनतेच्या या निर्धाराने निपटून काढला.लढाई जनाजनांचीमहात्मा गांधींसारख्या लोकोत्तर विभूतीने आपल्या देशबांधवांना ह्यकरेंगे या मरेंगेह्ण या निग्रहाने चले जाव अभियान चालवण्याचा संदेश दिला होता. पण, प्रत्यक्षात कोणती पावले उचलायची, हे अभियान नेमके कसे चालवायचे, यासंबंधी काहीच सांगितलेले नव्हते. इंग्रज सरकारने गांधीजींसारख्या नेतृत्व करणार्‍या सार्‍याच प्रमुखांना काही सांगण्यापूर्वी, दिशानिर्देश देण्याची संधीही न देता स्थानबद्ध करून टाकले होते. त्यापूर्वी गांधीजी या चळवळीबद्दल आपल्या सहकार्‍यांशीही बोलले नव्हते. ह्यह्यआपण हिंदुस्थान सोडून जायला तयार आहोत, असे ब्रिटिश सरकार जाहीर करायला तयार नसेल तर आपण एक दिवस देशभर हरताळ पाळावा,ह्णह्ण एवढेच काय ते बोलले होते. एक दिवसाच्या हरताळाने, आजच्या भाषेत बंदने, काय साध्य होईल, असा प्रश्‍न त्यावेळच्या इतर नेत्यांना पडला होता.आपली कृती शांततामय आणि अहिंसक असली पाहिजे,ह्ण असेही ८ ऑगस्टच्या त्या प्रस्तावात म्हटले होते. त्यामुळे गांधीजींना लगेच अटक होईल, असेही कुणाला वाटले नव्हते. पण, इंग्रज सरकार त्या वेळी तेवढ्यावरच थांबले नाही. त्याने कॉंग्रेस संघटना बेकायदेशीर ठरवली, ठिकठिकाणच्या पक्ष कार्यालयांना सील ठोकले, मुखपत्रांचे प्रकाशन थांबवले. देशात दहशतीचे वातावरण निर्माण व्हावे असाच प्रयत्न इंग्रज सरकारचा त्या वेळी होता. या सरकारी अरेरावी व दडपशाहीविरुद्ध ९ ऑगस्टलाच तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची पहिल्या दिवशीची केंद्रे मुंबई, पुणे व अहमदाबाद होती. पुढे देशभर हे आंदोलन पसरले.त्यावेळचा स्वातंत्र्यलढा गांधीजी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वात असला, तरी समाजवादी पक्षाची भूमिका ह्यगांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढाऊ पवित्रा घेतला पाहिजे, अशीच होती. त्यामुळे ९ ऑगस्टपासूनच्या चले जाव आंदोलनात समाजवादी पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावून त्याला प्रखरता मिळवून दिली होती. समाजवाद्यांनी नामांतर, वेशांतर करून, भूमिगत होऊन जनजागृती सुरू केली. त्या आंदोलनात रेल्वेरूळ उखडणे, स्थानकांची मोडतोड करणे, टपाल कार्यालये जाळणे- उद्‌ध्वस्त करण्याचे प्रकार देशभर झाले. विशेषत: बंगाल आणि महाराष्ट्रात ह्यप्रतिसरकारेह्ण स्थापण्यात आली. या प्रतिसरकारांमुळे मूळ इंग्रज सरकार खवळले आणि त्याने दडपशाही सुरू केली. त्यात दहा हजारांहून अधिक मृत्यू, तितकेच जखमी, महिलांची विटंबना, घरांची पोलिसांकडून जाळपोळ, लाखोंना अटक अशा नोंदी आहेत. ही चले जाव चळवळ सेनापतीच्या अनुपस्थितीत सैनिकांनी केलेल्या लढाईसारखी होती, असेही तिचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. या क्रांतिलढ्याला वंदन.सौजन्य : ईंटरनेट