शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारी कारवाईची नोटीस मागे घ्या!

By admin | Updated: June 24, 2016 04:51 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २६३ शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची नोटीस शिक्षण आयुक्तांनी बजावली आहे. मात्र, काहीही चूक नसताना अशा प्रकारे नोटीस बजावणे बेकायदेशीर आहे, असा दावा मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केला आहे. संघटनेने गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत, या कारवाईचा विरोध केला आहे.संघटनेचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, ‘जून महिन्यात सुट्टीच्या कालावधीत काही शिक्षकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, जून महिन्यात नोटीस देताना त्याचे उत्तर ३१ मे २०१६पर्यंत देण्याचे आदेश आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत सर्व संचालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मात्र, तो हेतू साध्य न होता, आयुक्तांमुळे गोंधळात आणखी भर पडली आहे,’ असा आरोप देशमुख यांनी लावला आहे.या आधी चार महिन्यांपूर्वी शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले होते. त्या वेळी २२ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी बैठक घेऊन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका महिन्यांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत वारंवार संघटनेने स्मरणपत्रेही दिली आहेत. त्यामुळे अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाही का, असा सवाल शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)