शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ‘फर्स्ट सिटी’ प्रकल्पाचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: May 5, 2016 01:28 IST

नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आज मान्यता

मुंबई : नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आज मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पासाठी आयजेएम या मलेशियन कंपनीचे सहाय्य लाभणार आहे. चौरंगी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या अतुल शिरोडकर यांच्या कंपनीने हा गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला होता. तथापि, प्रकल्पाबाबत तक्रारी आल्यानंतर आधीच्या आघाडी सरकारने मिहान आणि या कंपनी दरम्यान झालेला करार रद्द केला होता. तेव्हापासून काम थांबल्याने खळबळ उडाली. प्रकल्प रखडल्यानंतर फ्लॅटधारकांनी मिहान आणि चौरंगी कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या होत्या. हा प्रकल्प पूर्ण करण्याची कंपनीची इच्छा असल्याचे सांगताना शिरोडकर यांनी विजया बँकेच्या १२० कोटींच्या कर्जापैकी १० टक्के एमएडीसीकडे भरले होते. शिरोडकर यांनी विनंती करूनदेखील कराराचे पुनरुज्जीवन होऊ शकले नव्हते. शिरोडकर यांनी गेल्या ३० मार्च रोजी सरकारला नवीन प्रस्ताव दिला. त्यानुसार विजया बँकेचे १२० कोटी रुपयांचे कर्ज एकरकमी फेडण्याची आणि एमएडीसीचा पैसाही परत करण्याची तयारी दर्शविली आणि प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम आयजेएम कंपनीसोबत संयुक्त कंपनी स्थापन करून पूर्ण केले जाईल, असा प्रस्ताव दिला. एमएडीसीच्या आजच्या बैठकीत त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. आजच्या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस.मीना, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएडीसीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्कसाठी लवकरच निविदानागपूरच्या मिहान प्रकल्पात ३०० एकर परिसरात अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या प्रकल्पाला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिर्डी येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या विमानतळाचे काम बव्हंशी पूर्ण झाल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी यावेळी दिली. अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्कसाठी कृषी क्षेत्रातील प्रथम श्रेणीच्या उद्योजकाकडून खुल्या निविदा मार्गाने प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी कृषी क्षेत्रातील उत्तम संस्था पुढे याव्यात म्हणून ‘एमएडीसी’ने त्यांच्या गुणवत्तेसाठी मानदंड ठरविले आहेत. संबंधित उद्योजकाची गेल्या तीन वर्षाची वार्षिक उलाढाल ३०० कोटी रु पयांची असावी, त्याने दरवर्षी नागपूर व परिसरातील शेतकरी आणिआदिवासींकडून शेती व वन्य औषधी अशा स्वरूपाच्या दर वर्षी १०० कोटी रूपयाचा माल खरेदी करावयाचा आहे. त्याने दरवर्षी एक हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे.