शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण

By admin | Updated: September 20, 2016 03:25 IST

स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला

अलिबाग : रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी येथे दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोमवारी याबाबतची पत्रकार परिषद पार पडली. मतदार याद्यांबाबत कोणत्या राजकीय पक्षांच्या काही हरकती आहेत का? तसेच या कार्यक्र माबाबत त्यांच्यामध्येही जागृती करण्यासाठी जिल्हा स्तरावरील पक्ष प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. परंतु त्या बैठकीला बहुतांश सर्वच पक्ष प्रमुखांनी दांडी मारली. १८ सप्टेंबर (रविवार) आणि १९ आॅक्टोबर (रविवार) या सुटीच्या दिवशी देखील विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०१७ रोजी ज्या नागरिकाचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्याचप्रमाणे ज्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही, असे नागरिक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास पात्र असल्याचे मलिकनेर यांनी सांगितले. जिल्ह्यातील दोन हजार ४९३ मतदान केंद्रांवर मतदार याद्यांच्या दोन प्रती माहितीकरिता देण्यात आल्या आहेत. त्याबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांनी नोंदवावेत, असे आवाहन मलिकनेर यांनी केले. ज्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असेल, तर त्यांनी तातडीने ते नोंदवून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी दांडी मारली. शेकापचे अनंतराव देशमुख, चेंढरे सरपंच परेश देशमुख हेच हजर होते. (प्रतिनिधी)पूर्ण झालेली कामे१६ सप्टेंबर रोजी प्रसिध्द मतदार यादीनुसार जिल्ह्यात २० लाख ४२ हजार ८६१ मतदार नोंदणीकृत आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ९० टक्के मतदारांपैकी ८७ टक्के मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे काम पूर्ण, कर्जतमध्ये ९७ टक्के मतदारांपैकी ९६ टक्के फोटोचे काम पूर्ण, उरण ९६ टक्के मतदारांपैकी ९५ टक्के फोटो, पेण ९४ पैकी ९३ टक्के फोटो, अलिबाग ९६ ंपैकी ९५ टक्के फोटो, श्रीवर्धन ९७ पैकी ९७ टक्के फोटो, महाड ९५ टक्के मतदारांपैकी ९४ टक्के फोटोचे काम पूर्ण झाले आहे.