शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाला सुधारित विम्याचे ‘कवच’

By admin | Updated: July 7, 2016 02:03 IST

नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतक-यांना संरक्षित रकमेत भरघोस भरपाईची हमी; ३१ जुलै अंतिम मुदत.

संतोष वानखडे / वाशिम नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना आता सुधारित पीक विमा योजनेतून भरघोस भरपाईची हमी मिळाली असून, या योजनेत ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.नैसर्गिक आपत्ती आणि पिकांवरील कीड, रोगराईमुळे शेतकर्‍यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन घेता येत नाही. उत्पादनात घट झाल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. परिणामी, शेतकर्‍यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या तुलनेत आता नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ताही कमी करण्यात आला आहे. खरीप हंगामात विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, रब्बी हंगामात १.५ टक्के आणि कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के अशी विमा हप्त्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली. पूर्वी सोयाबीन या पिकासाठी भरपाईची रक्कम हेक्टरी १६ हजार रुपये अशी होती. २0१६ पासून सदर रक्कम ३६ हजार अशी करण्यात आली असून, विमा हप्ता ७२0 रुपये निश्‍चित करण्यात आली. खरीप ज्वारीसाठी हेक्टरी पीक संरक्षित रक्कम २४ हजार असून, शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता ४८0 रुपये असा आहे. याप्रमाणे तूर पिकासाठी हेक्टरी संरक्षित रक्कम २८ हजार असून विमा हप्ता ५६0 रुपये आहे. मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी संरक्षित रक्कम १८ हजार असून हप्ता ३६0 रुपये, भुईमुगसाठी संरक्षित रक्कम ३0 हजार असून हप्ता ६00 रुपये, सूर्यफूलसाठी संरक्षित रक्कम असून २२ हजार रुपये असून हप्ता ४४0 रुपये, कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ३६ हजार असून हप्ता १८00 व कांदा पिकासाठी संरक्षित रक्कम ५0 हजार असून हप्ता २५00 रुपये आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविता येणार आहे. दरम्यान, ही नवीन विमा योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी वाशिमच्या कृषी विभागाने जनजागृती सुरू केली आहे.