शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पैसेवारीमुळे महसूल सचिवास नोटीस

By admin | Updated: March 12, 2016 04:11 IST

पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे

नागपूर : पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने प्रतिवादी महसूल विभागाचे सचिव आणि अमरावती विभाग आयुक्तांना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.पैसेवारी मूल्यांकन करून शासनाने सिंचनाची सुविधा असलेल्या नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. परंतु गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पश्चिम विदर्भात मात्र काही मोजक्याच गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आणि देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील १९६७, अकोला येथील ९९७, यवतमाळ येथील ९७०, वाशीम येथील ७९३ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली. तर, नाशिक विभागात सिंचनाची सुविधा असताना ४८८८ गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी दर्शविण्यात आली. राज्य सरकारने यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वाशीम या जिल्ह्यांवर अन्याय केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जाचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)