शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स, टाटाला महसूलचा दणका

By admin | Updated: March 4, 2017 03:25 IST

सीआरझेड एकमधील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्याने रिलायन्स व टाटा या कंपन्यांना महसूल विभागाने दणका दिला

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे; कांदळवन, पाणथळ व सीआरझेड एकमधील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्याने रिलायन्स व टाटा या कंपन्यांना महसूल विभागाने दणका दिला आहे. सरकारी जमीन व प्रतिबंधित क्षेत्रात वीजपुरवठा करु नये, सध्या केलेला वीजपुरवठा बंद करा; अन्यथा पर्यावरणाचा ऱ्हास आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. मीरा-भार्इंदरमधील सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊ नये म्हणून महसुल विभागासह महापालिकेचीही स्थानिक प्राधिकरण म्हणून जबाबदारी आहे. महसूल विभागाकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने त्यांना पालिकेवर अवलंबून रहावे लागते. पालिका सरकारी जमीन असल्याचे तुणतुणे वाजवते, पण अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना; तसेच माफियांना एकप्रकारे पाठीशीच घालते. सरकारी जागेतील अतिक्रमणांना पाणी, फुटपाथ, दिवाबत्ती आदी सुविधा नगरसेवकांच्या आग्रहाखातर पुरवल्या जातात. कर आकारणीही लगोलग केली जाते. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांना शासनाची कुठलीही परवानगी न घेता रिलायन्स, टाटा आदी कंपन्या वीज पुरवतात. अशा झोपड्या-खोल्यांची माफियांकडून सर्रास विक्री केली जाते. असाच प्रकार सीआरझेड एक, कांदळवन व पाणथळ या प्रतिबंधित क्षेत्रातही केला जातो. उच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणासाठी वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत. त्यात या क्षेत्रात भराव, बांधकामे करण्यास सक्त मनाई करूनही आदेशांचे सर्रास उल्लंघन केले जाते. वीजपुरवठा सहज असल्याने सरकारी जमिनीवर अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे महसुल विभागाने रिलायन्स एनर्जीविरोधात भार्इंदरला पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)>खरमरीत पत्र आणि तंबीमीरा रोडच्या पश्चिमेस नाझरेथ आगर येथे कांदळवन, सीआरझेड एक, पाणथळ क्षेत्रबाधित सरकारी जमिनीत तिवरांची झाडे तोडून भराव करुन झालेल्या बांधकामांना रिलायन्सने केबल टाकून मीटर लावत वीजपुरवठा केल्याचे उघड झाले. त्यानंतर मीरा-भार्इंदरचे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी रिलायन्स व टाटा या कंपन्यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्या ऐवजी प्रतिबंधित क्षेत्रात विजेची केबल टाकणे, मीटर लावणे आदी कामांमुळे आदेशांचा अवमान व उल्लंघन होत असल्याचे कळवले आहे. सरकारी जमिनीवर, तसेच न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नव्याने केबल व मीटर टाकू नये, असे बजावले आहे.