शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्री खडसेंच्या पुतण्यासह चौघांवर गुन्हा

By admin | Updated: January 1, 2015 08:43 IST

८० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

आकोट बाजार समिती : आकोट (जि़ अकोला) : आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बांधकाम प्रकरणात खोटे दस्तऐवज करून ८० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००८ ते २०१४ या काळात बांधकाम करण्यात आले. या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार १० जानेवारी २०१४ रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून कामाची पाहणी करुन अहवाल सादर केला़ बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, माजी सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तू शिल्पकार तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे हरीश खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांनी संगनमत करून मोजमाप पुस्तिकेमध्ये न झालेल्या, तसेच अर्धवट झालेल्या कामांचे खोटे मोजमाप लिहून खोटे दस्तऐवज तयार केले. यात ८० लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे अहवालात नमूद आहे.याप्रकरणी माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी आकोट शहर पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पुंडकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या वर न्या़ व्ही.एन. मोरे यांच्यासमोर सुनावणी होऊन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरून बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, तत्कालीन सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तू शिल्पकार हरीश काशीनाथ खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांच्याविरुद्ध आकोट शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.