शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्यातील ‘तोडपाणी’ बंद!

By admin | Updated: June 8, 2016 03:51 IST

शासनास देय असलेला कर अथवा दंडाला स्थगिती मिळविण्याच्या प्रकारांना चाप लावणारा निर्णय एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : शासनास देय असलेला कर अथवा दंडाला स्थगिती मिळविण्याच्या प्रकारांना चाप लावणारा निर्णय एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. शासनास देय असलेला दंड, कर भरण्यास टाळाटाळ करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी मुदत मिळावी म्हणून स्थगिती आणली जाते. त्यातून अनेकदा ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असतात. आजच्या निर्णयानुसार देय रकमेच्या २५ टक्के रक्कम शासनाकडे जमा केल्याशिवाय अशा प्रकरणात आदेशास स्थगितीच देता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता; १९६६च्या कलम २५६मध्ये सुधारणा करणारे विधेयक सादर करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. शासनाकडून विविध प्रकारचे शुल्क, आकार, दंड, रूपांतरण कर आदींची आकारणी करण्याबाबतच्या काही तरतुदी आहेत. अशा रकमांचा भरणा करण्यासाठी संबंधित विभागाकडून आदेश काढण्यात येतात. मात्र, या आदेशांविरोधात अनेकदा संबंधित व्यक्ती वरिष्ठ महसुली प्राधिकाऱ्याकडे अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात. त्यातील बहुतांश प्रकरणांत संबंधित महसूल प्राधिकाऱ्याकडून अशा आदेशांना स्थगिती दिली जाते. त्यानंतर ही प्रकरणे तातडीने निकाली न निघाल्याने शासनास देय असलेली रक्कम दीर्घ कालावधीसाठी अडकून पडते. या निर्णयामुळे या गोष्टींना चाप लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)प्राधिकरणाची स्थापनापालघर शहराचा सुनियोजित विकास करण्यासह नवीन जिल्हा प्रशासकीय मुख्यालयाचे काम सिडकोच्या माध्यमातून जानेवारी २०१९पर्यंत प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरण करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणीकेंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी राज्य आयुष सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. विविध विभाग एकत्रितपणे अंमलबजावणी करणार आहेत.