शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन लॉटरीपासून ७४० कोटींवर महसूल

By admin | Updated: September 27, 2016 21:29 IST

राज्य शासनाला आॅनलाईन लॉटरीपासून २०१५-१६ मध्ये १११ कोटी तर, गेल्या ७ वर्षांत ७४० कोटी रुपयांवर महसूल मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 27 - राज्य शासनाला आॅनलाईन लॉटरीपासून २०१५-१६ मध्ये १११ कोटी तर, गेल्या ७ वर्षांत ७४० कोटी रुपयांवर महसूल मिळाला आहे. शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.आॅनलाईन लॉटरीचे कायद्यानुसार नियमन करणे राज्य शासनाची जबाबदारी आहे. यामुळे शासन दर आठवड्यात अधिकृत आॅनलाईन लॉटरीजची यादी जाहीर करते. ही यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाते. तसेच, शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. पोलिसांनाही अधिकृत आॅनलाईन लॉटरीजची माहिती देऊन अन्य आॅनलाईन लॉटरीजवर कारवाई करण्याची सूचना केली जाते. त्यानुसार, पोलिसांनी २०१५-१६ मध्ये २२ आरोपींविरुद्ध १७ एफआयआर तर, एप्रिल-२०१६ पासून ९ आरोपींविरुद्ध ३ एफआयआर नोंदविले आहेत असेही शासनाने सांगितले आहे. यासंदर्भात यवतमाळ येथील चंदन त्रिवेदी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली.देशात लॉटरी (नियमन) कायदा-१९९८ व लॉटरी (नियमन) नियम-२०१० लागू आहेत. यांतर्गत लॉटरी व्यवसाय करता येतो. परंतु, कायदा व नियमांचे कुणीच पालन करीत नाही. राज्यात आॅनलाईन लॉटरीचा अवैधपणे व्यवसाय केला जात आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ एप्रिल २०१६ रोजी जाहीर केल्यानुसार २००७ ते २००९ या काळात आॅनलाईन लॉटरी कंपन्यांनी ९३३.१४ कोटी रुपयांचा कर बुडवला आहे.