शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवहन’ला १00 कोटींचा महसूल

By admin | Updated: April 3, 2017 05:45 IST

बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली.

मुंबई : बीएस या मानकात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यानुसार, बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली. मात्र, ३१ मार्चपर्यंत वाहन कंपन्यांनी या मानकातील वाहने सवलत देऊन विक्रीला काढल्याने त्याचा फायदा राज्याच्या परिवहन विभागाला झाला आहे. ३0 व ३१ मार्च या दोन दिवशी झालेल्या अन्य वाहनांबरोबरच बीएस-३ वाहन नोंदणीमुळे तब्बल १00 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. वाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन नोंदणी व्यवस्थित पार पडावी, यासाठी आरटीओ कार्यालयेही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली. राज्यभरात दररोज ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते. मात्र, बीएस-३ वाहनांमुळे ही नोंदणी तीन पटीने वाढली. २0१५-१६ रोजी २३ लाख ३ हजार ७८३ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, २0१६-१७ या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याच्या शेवटच्या २ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहन नोंदणी झाली. या संदर्भात राज्य परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना विचारले असता, ३0 आणि ३१ मार्च रोजी बीएस-३ मानकातील वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने दररोज मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली. वाहन नोंदणीतून रोज २0 ते २५ कोटी रुपये महसूल मिळतो. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हा महसूल अंदाजे १00 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे सांगितले. ३१ मार्चपर्यंत विक्री झालेल्या बीएस-३ इंजिन वाहनांची नोंदणी १ एप्रिलनंतरही आरटीओत होऊ शकते. त्यामुळे वाहन चालकांना हा दिलासाच असणार आहे. (प्रतिनिधी)>सवलत देऊन विक्रीवाहन कंपन्यांकडून ३0 व ३१ मार्च रोजी बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहन विक्री केली. ३१ मार्च रोजी तर या मानकातील वाहन विक्रीसाठी शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाहन खरेदीसाठी तर मुंबईसह राज्यातील अन्य शहरांतील शोरूममध्ये झुंबडच उडाली होती.