नागपूर : गटातटामध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा एकजूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपाइं नेत्यांनी पुन्हा एखदा एकीकरणाचा सूर आवळला आहे. अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेले खा. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि डॉ. राजेंद्र गवई या रिपाइंच्या तीन प्रमुख नेत्यांनी एकीकरणाची दर्शविल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नामुळे या प्रमुख नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. निमित्त होते बरिएमंच्या वर्धापनदिन समारंभाचे. एकीकरण झाल्यास मी माझा पक्ष त्यात विलीन करण्यास तयार असल्याचे आठवले म्हणाले, तर एक दिवस ऐक्य निश्चित होईल, असा विश्वास प्रा. कवाडे यांनी व्यक्त केला. डॉ. गवई म्हणाले, एकीकरण तातडीने होणार नाही, कारण बरेच पाणी वाहून गेले. परंतु त्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.
रिपाइं नेत्यांचा पुन्हा एकीकरणाचा सूर
By admin | Updated: April 12, 2015 01:31 IST