शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत

By admin | Updated: December 17, 2015 00:52 IST

लवासाने अवैधरीत्या घेतलेली १३ आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे २०० एकर जमीन दोन महिन्यांपूर्वी शासनाच्या नावे झाली होती. आता कायदेशीर बाबींची पूर्तता करून, अखेर ही जमीन

पुणे : लवासाने अवैधरीत्या घेतलेली १३ आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे २०० एकर जमीन दोन महिन्यांपूर्वी शासनाच्या नावे झाली होती. आता कायदेशीर बाबींची पूर्तता करून, अखेर ही जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात आली असल्याची माहिती मावळ प्रांत अधिकारी सुनील थोरवे यांनी सांगितले. लवासा कंपनीकडून मोसे खोऱ्यातील वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील २० गावांमधील तब्बल २५ हजार एकर जमिनीवर ‘लेक सिटी’ उभारण्यात येत आहे. यासाठी जमीन खरेदी करताना लवासाने अनेक बेकायदेशीर व्यवहार केले असून, खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना बंदी असताना आदिवासींच्या जमिनी घेतल्या होत्या.या संदर्भात शासनाने केलेल्या चौकशीत मोसे खोऱ्यांतील काही आदिवासींना सुमारे ४० वर्षांपूर्वी अ‍ॅग्रीकल्चरल लँड सीलिंग अ‍ॅक्ट अंतर्गत जमीन मिळाली होती. ती अहस्तांतरणीय असून, कायद्यानुसार बिगर-आदिवासींना ती खरेदी करता येत नाही. असे असताना लवासाने बेकायदेशीररीत्या आदिवासी शेतकऱ्यांची ही जमीन खरेदी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या मुळेच लवासाने घेतलेल्या आदिवासींच्या जमिनी परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. (प्रतिनिधी)कोणत्याही प्रकल्पासाठी एकदा संपादित झालेली जमीन, पुन्हा प्रकल्पग्रस्तांना दिली जात नाही. ती शासनाच्या नावावर जमा होते, परंतु लवासाच्या प्रकरणात प्रथमच शासनाच्या नावावर झालेली जमीन, दोन महिन्यांतच संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात आली. जमिनीच्या क्षेत्रानुसार खातेदारांची नावे सातबारा व फेरफार करण्यात आल्याचे प्रांत अधिकारी थोरवे यांनी सांगितले.