शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्मचा-यांनाही मानीव बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:35 IST

एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या आणि बढतीसाठी पात्र असूनही प्रत्यक्ष बढती न मिळू शकलेल्या कर्मचा-यांना मानीव बढती देण्याची ‘अ‍ॅश्युअर्ड करीयर प्रोग्रेशन स्कीम’

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या आणि बढतीसाठी पात्र असूनही प्रत्यक्ष बढती न मिळू शकलेल्या कर्मचा-यांना मानीव बढती देण्याची ‘अ‍ॅश्युअर्ड करीयर प्रोग्रेशन स्कीम’ (एसीपीएस)ही योजना लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाºयांनाही या योजनेचा लाभ मिळावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिला आहे.यामुळे १ आॅक्टोबर २००६ ते १ एप्रिल २०१० या चार वर्षांत निवृत्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाºयांनाही याचा लाभ मिळेल. म्हणजे त्यांना या काळाच्या वाढीव पगाराची थकबाकी मिळणार नसली तरी या काळात ज्यां तारखेला २४ वष सर्वा पूर्ण झाली असेल तेव्हापासून बढती मिळाली असे मानून हे कर्मचारी त्या वरच्या पदाचे सुधारित पेन्शन मिळण्यास पात्र ठरतील.सुरुवातीस सरकारने ही योजना १ आॅक्टोबर २००६ पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली. मात्र १ जुलै २००७ रोजी स्पष्टीकरण करण्याच्या नावाखाली नवा जीआर काढून, जे कर्मचारी आॅक्टोबर २००६ ते एप्रिल २०१० या काळात निवृत्त झाले त्यांना या योजनेचा लाभ न देण्याचे सरकारने ठरविले.या काळात निवृत्त झालेल्या सुभाष रामराव पवार व अन्य १३ कर्मचाºयांनी यास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले. ‘मॅट’ने हा निर्णय बेकायदा ठरवून रद्द केला. त्याविरुद्ध सरकारने केलेली रिट याचिका न्या. विजया कापसे ताहिलरामानी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, अशी योजना लागू करणे सरकारवर बंधनकारक नव्हते व हा निर्णय पूर्णपणे धोरणात्मक आहे, हे मान्य परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर तो लागू करताना सरकार सेवेतील आणि निवृत्त अशी कृत्रिम वर्गवारी करून पक्षपात करू शकत नाही.खंडपीठाने म्हटले की, पात्र असूनही पदे उपलब्ध नसल्याने कर्मचाºयांना खालच्या पदांवर अडकून पडावे लागते. म्हणून ही योजना सुरु केली. यात सरकारने कर्मचाºयांना मागील तारखेपासून वाढीव पगार देणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांनाही थकबाकी द्यावी लागणार नसूनही त्यांना योजनेतून वगळणे अन्यायकारक आहे.