शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या हंगामासाठी निवृत्त चालकांची मदत

By admin | Updated: June 25, 2016 03:34 IST

येणाऱ्या काळातील गर्दीचा हंगाम पाहता चालकांची कमतरता भासू नये, यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : येणाऱ्या काळातील गर्दीचा हंगाम पाहता चालकांची कमतरता भासू नये, यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवृत्त चालकाला दिवसाला ५00 रुपये पगार देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कंत्राटी पद्धतीने त्यांना सेवेत ठेवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. एसटी महामंडळात ३६ हजार ८६४ चालक आहेत. २0१६ च्या मे महिन्यापर्यंत १,२00 ते १,५00 च्या दरम्यान चालक निवृत्त झाले आहेत. एकूणच चालकांची गरज पाहता राज्यात आणखी २ हजार ४७४ चालक लागणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे महामंडळाने एसटीच्याच निवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू केली आहे. ज्याचे वय ५८ वर्षे पूर्ण झालेले आहे, पण ६0 वर्षे झालेले नाही, अशी अट असलेल्या चालकांची भरती केली जात आहे. हे चालक कंत्राटी पद्धतीने एसटीत काम करतील आणि त्यांच्याकडून काम करण्याचे इच्छापत्र लिहून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)