शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचा निकाल ठेवला राखून

By admin | Updated: August 5, 2016 05:22 IST

सात नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय गुरुवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला

मुंबई : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय गुरुवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा एकदा पडताळणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठवण्यात आले आहे. काँग्रेसच्या नगरसेवक व कोल्हापूर महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील, ताराराणी आघाडीचे नीलेश देसाई आणि भाजपाचे संतोष गायकवाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने ९ मे रोजी अवैध ठरवले. त्यांनी खोटी जात दाखवल्याचे समितीने म्हटले आहे. त्यानंतर १० मे रोजी कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी जात पडताळणी समितीच्या आदेशावरून महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांना अपात्र ठरवले. या नगरसेवकांनी जात पडताळणी समितीच्या व आयुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)>जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळण्याचे आदेशवृषाली कदम यांचे जात प्रमाणपत्र पडताळण्यासाठी पुन्हा एकदा जात पडताळणी समितीकडे पाठवले. त्यामुळे कदम यांना दिलासा मिळाला आहे. कदम यांनी केलेल्या याचिकेनुसार, कोल्हापूर तहसिलदारांकडे जातीचा दाखला सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाकरिता जात पडताळणी समितीपुढे सादर केले. पडताळणीदरम्यान, तहसिलदारांनी कदम यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने जात प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असे समितीला कळवले. त्यामुळे जात पडताळणी समितीने कदम यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही. त्याच दिवशी कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी त्यांना नगरसेवक म्हणून पदभार सांभाळण्यास अपात्र ठरवले होते.