शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

दहावी-बारावीचा निकाल वेळेतच

By admin | Updated: May 21, 2015 00:06 IST

चर्चेला पूर्णविराम : कोकण बोर्डाने स्पष्ट केली भूमिका

सागर पाटील - टेंभ्ये -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे निकालाबाबतच्या अफवांवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकांत पाटील यांनी केले आहे. दहावी, बारावीचा निकाल न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेतच जाहीर होईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सोशल मीडियावरून सध्या दहावी व बारावीच्या निकालाबाबत अनेक पोस्ट वाचायला मिळत आहेत. मात्र राज्य मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दोनही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे राज्य मंडळाला बंधनकारक आहे. त्यादृष्टीने निकालाची तयारी सुरु असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले. यापूर्वी निकाल जाहीर होण्याच्या तारखा लक्षात घेतल्यास इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा आॅनलाईन निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन निकालाची तारीख आगामी पाच ते सहा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.कोकण विभागीय मंडळांतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ८० विद्यार्थी, तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला ४१,५५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी आहे. दोन्ही परीक्षांना प्रविष्ठ झालेले विद्यार्थी व पालकवर्गाला निकालाची उत्सुकता लागली आहे. गतवर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरीच्या चिन्मयी मटांगे या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी ही परंपरा कायम राहाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.यावर्षीच्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागीय शिक्षण मंडळ राज्यामध्ये अव्वल असेल. कोकण मंडळाच्या स्थापनेपासूनची परंपरा यावर्षीदेखील कायम राहील. विद्यार्थी, शिक्षक व पालक हा शैक्षणिक त्रिकोण कोकणात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असल्याने उज्ज्वल यश मिळविणे कोकण मंडळासाठी कठीण नाही.- आर. बी. गिरी, सचिव, कोकण शिक्षण मंडळ.