शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चलन नसल्याने मजुरी म्हणून देतात धान्य

By admin | Updated: November 19, 2016 03:21 IST

सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार.

सुनील घरत,

पारोळ- सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांची चलनबंदी केल्याने ऐन कापणीच्या मोसमात मजुरी कशी देणार. त्यातच बॅँकांच्या व एटीएमच्या बाहेर लांबचलाब रांगा असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, यावर पारंपरिक वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे तोडगा काढून मजुरांना मजुरी म्हणून धान्य देण्याचा तोडगा बळीराजाने काढला आहे.पूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून कापणीनंतर हाती लागलेल्या पिकाची झोडणी करून घरात लवकर आणण्यासाठी वसईतील बळीराजाची लगबग सुरु आहे. वसई पूर्व ग्रामीण भागात जिकडे तिकडे आपापल्या शेतात बनवलेल्या खळ्यामध्ये पहाटेपासून झोडणीची व वाढवणीची कामे सर्वत्र सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे प्राप्त मजुरांच्या शोधात बळीराजा हैराण झाला आहे. त्यातही मिळणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी सुट्टे चलन नाही. यावर तोडगा म्हणून मजुरीच्या बदल्यात धान्य अथवा उधारीने मजूर काम करत आहेत. चलन अडचणीच्या काळामध्ये झोडणीची घाई का करता, असे विचारले असता शेतकरी सांगत आहेत की, पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात ही कामे शिल्लक राहिली आणि यांना वेळ दिला तर शेतातील ओल निघून जाईल व द्विदल पिके उशिरा पेरल्याने पिके पाहिजे तशी होणार नाहीत म्हणून आम्ही घाई करत आहोत. असे सांगितले.>व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटवसईत भातखरेदी केंद्र होणार, ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वसईत भातखरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीचा भात पिकाला खाजगी व्यापारी कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारी दर, उच्च प्रतीच्या भात, पिकाला प्रतिक्विंटल १५१० रुपयांचा दर असून व्यापारी मात्र ११०० ते १२०० च्या घरात खरेदी करतात.