शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल.

ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणारमुंबई - ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांकडून कामाची तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी आज विधानसभेत केली. ग्राम पाणी पुरवठ्या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहेत, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी आज व्यक्त केले.बोरोळ, ता.देवणी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतचा मूळ प्रश्न ज्येष्ठ सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील यांनी विचारला होता. या गावात विहिरीसाठी १५ मीटर खोदकाम होऊनही पाणी न लागल्याने दुसरा उद्भव घ्यावा लागला, त्यासाठी ६१ लाख रुपये खर्च झाले, असे सोपल यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना रखडण्याचे कारण म्हणजे ग्राम पाणीपुरठा समित्यांवर जबाबदारी निि›त नाही. त्यामुळेच गैरव्यवहार वाढत असल्याचे सर्वपक्षीय आमदारांनी सांगितले. अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ग्राम पाणीपुरवठा समित्यांमध्ये तज्ज्ञ नसतात. त्यामुळे मनमानी निर्णय होतात, अशी भावनाही व्यक्त झाली. तेव्हा या समित्यांची पुनर्रचना केली जाईल, असे सोपल म्हणाले. जलस्त्रोताचे काम झाल्याखेरीज इतर खर्च करु नये असा स्पष्ट सूचना देण्यात येईल, असेही मंत्री सोपल यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)